*अक्कलकुवा पोलीसांची मोठी कारवाई अवैध ताडी विक्रेत्यांवर छापे,मोठ्या प्रमाणात ताडी जप्त करुन केली नष्ट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा पोलीसांची मोठी कारवाई अवैध ताडी विक्रेत्यांवर छापे,मोठ्या प्रमाणात ताडी जप्त करुन केली नष्ट*
*अक्कलकुवा पोलीसांची मोठी कारवाई अवैध ताडी विक्रेत्यांवर छापे,मोठ्या प्रमाणात ताडी जप्त करुन केली नष्ट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीसांनी अवैध ताडी विक्रेत्याविरुध्द धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक अर्जुन पटले व त्यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकुन मोठ्या प्रमाणात अवैध ताडी जप्त करुन नष्ट केली असून आरोपीवर गुन्हे दाखल केले आहेत. अक्कलकुवा शहरातील बस स्थानक परिसरात पहीली कारवाई दिनांक 15 जुलै 2026 रोजी बसस्थानक परिसरात अवैध ताडी विक्रेत्यावर छापा टाकुन 60 लीटर ताडी जप्त करुन नाश करण्यात आली. आरोपी करुनाकर सैदुलु राचाकोंडा रा. रा. केथेपल्ल मंडप गुडीवाडा नलगोंडा आंध्रप्रदेश याच्यावर अक्कलकुवा पो.स्टे गुरनं 328/2026 महाराष्ट्र दारुबंदी अधि कलम 65 (ई) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. कोराई गावात दुसरी कारवाई दिनांक 17 जुलै 2026 रोजी कोराई गावात दहेली नदीच्या किनारी अवैध ताडी विक्रेत्यावर छापा टाकुन 40 लीटर ताडी जप्त करुन नाश करण्यात आली. आरोपी सुरेश नुरजी तडवी रा. कोराई ता. अक्कलकुवा याच्यावर अक्कलकुवा पो.स्टे गुरनं 331/2026 महाराष्ट्र दारुबंदी अधि कलम 65(ई) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. वाण्याविहीर गावाच्या फाट्यावर तिसरी कारवाई दिनांक 17 जुलै 2026 रोजी वाण्याविहीर गावाच्या फाट्यावर अवैध ताडी विक्रेत्यावर छापा टाकुन 55 लीटर ताडी जप्त करुन नाश करण्यात आली. आरोपी वेकन्ना विरास्वामी कोंडा रा. केथेपल्ली मंडप गुडीवाडा नलगोंडाआंध्रप्रदेश याच्यावर अक्कलकुवा पो. स्टे गुरनं 333/2026 महाराष्ट्र दारुबंदी अधि कलम 65 (ई) प्रमाणे दाखल करण्यात आला.
सोरापाडा गावात चौथी कारवाई दिनांक 18 जुलै 2026 रोजी सोरापाडा गावात अवैध ताडी विक्रेत्यावर छापा टाकुन 70 लीटर ताडी जप्त करुन नाश करण्यात आली. आरोपी गौडी चेरला लिंगय्या रा. वेलीशाला नलगोंडा राज्य आंध्रप्रदेश याच्यावर अक्कलकुवा पो.स्टे गुरनं 335/2026 करण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधि कलम 65 (ई) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकातील पथकातील ग्रेपोसई/ गुमानसिंग पाडवी, असई/नुर पिंजारी, पोहेकॉ/ 302 कृष्णा गावीत, पोशि/311 भरत भोई, पोशि/1269 चेतन वानखेडे, पोशि/1392 चंद्रसिंग वसावे, पोशि/1292 दिनेश बाविस्कर यांनी केली आहे.
अक्कलकुवा पोलीसांतर्फे परिसरातील अवैध ताडी विक्रेत्यांना कडक आव्हान व इशारा देण्यात आला आहे की, त्यांनी असे अवैध धंदे त्वरित बंद करावेत, अन्यथा त्यांच्यावर यापुढेही अशीच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.



