*अक्कलकुवा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात अवघ्या 4 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात अवघ्या 4 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल*
*अक्कलकुवा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात अवघ्या 4 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-15 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11.15 वाजण्याच्या सुमारास खटवाणी गावातील एका अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीने शाळेतील अभ्यासाचे संदेश पाठविले होते. पीडितेच्या घरात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे ती घराबाहेर जाऊन संदेश पाहत होती. त्यानंतर ती घरी परतत असताना खटवाणी गावातील दोन इसमांनी तिचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन केले. याप्रकरणी आरोपी विनोद कानजी तडवी याने पीडितेचा स्पर्श करून तिचा विनयभंग केला, तर अरविंद हिरालाल पाडवी याने ही बाब कोणाला सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.
पीडितेच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 329/ 2026 भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमान्वये दिनांक 16 जुलै 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली गांगुर्डे यांनी पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आणि उप विभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक, अर्जुन पटले अक्कलकुवा पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत वेगाने व प्रभावीपणे पूर्ण केला. तपासादरम्यान आवश्यक पुरावे संकलित करून अवघ्या चार दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आले. ही बाब अक्कलकुवा पोलिसांच्या तत्पर व कार्यक्षम तपासाची साक्ष देणारी आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित तपास अधिकारी व संपूर्ण तपास पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले असून, महिलांविरुद्ध व बालकांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांबाबत पोलिस प्रशासनाची शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला.



