ताजा खबरे:
*'एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय' येथे "शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथग्रहण सोहळा उत्साहात संपन्न!*
*तुळाजा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी*
*वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे 1500 हून अधिक सीड बॉल तयार*
*शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश,पक्ष संघटनेची ताकद असलेल्यांनाच पद-आ.चंद्रकांत रघुवंशी*
*धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी,आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*'एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय' येथे "शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथग्रहण सोहळा उत्साहात संपन्न!*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*'एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय' येथे "शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथग्रहण सोहळा उत्साहात संपन्न!*

  • Share:

*'एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय' येथे "शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथग्रहण सोहळा उत्साहात संपन्न!*
नंदुरबार(प्रतिनिधी):-'एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार' येथे शैक्षणिक वर्ष 2026 च्या शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाचा अधिकृत शपथग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीष पाडवी यांनी आपल्या शब्दात मांडले. या मंत्रिमंडळात विविध विभागात निवड झालेल्या सदस्यांमधे एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनीची निवड करण्यात आली. प्रज्ञा पावरा हिची हेड गर्ल वसंकेत पाटील याची हेड बॉय म्हणून निवड करण्यात आली. निवड शिस्त व अनुशासन मंत्री- या विभागात आरुषी रमेश झाँगडे या विद्यार्थिनीची आणि सिद्धार्थ दिनेश पवार या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली.
पर्यावरण मंत्री- पल्लवी अनिल पाडवी व मुलांमधे दीपक शंकरलाल मुंडेचा यांची निवड. क्रीडा मंत्री म्हणून ग्लोरी राहुल गावित व विद्यार्थिनींमधे बालिका बन्सीलाल वसावे.
यांची निवड करण्यात आली तसेच ग्रीन हाऊस कॅप्टन-आकांशा दीपक तडवी, व्हाईस कॅप्टन- प्रेम यशवंत अहिरे. रेड हाऊस कॅप्टन -मृणाली अतुल भामरे, कॅप्टन -प्रज्ञेश इंदास पावरा. ब्लू हाऊस- अरविंद राजकुमार कुशवाह.व्हाईस कॅप्टन- जास्मिन विलास पाडवी. येलो हाऊस -कॅप्टन नयन महेश पाडवी व व्हाईस कॅप्टन -मोक्षदा गणेश पाचपांडे यांची निवड करण्यात आली. या नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींना महाविद्यालयाच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी यांच्या हस्ते अधिकृत बॅज आणि सॅश प्रदान करून त्यांच्यावर शालेय शिस्तीची व विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली. पारदर्शक निवड प्रक्रिया:
या विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड अत्यंत पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने करण्यात आली होती. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या नावांची शिफारस केली होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा संपुर्ण पार्श्वभूमी तपासण्यात आली. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील सहभाग, क्रीडा व विज्ञान प्रदर्शन यांसारख्या क्षेत्रातील कामगिरी, नेतृत्व गुण, इतर शालेय उपक्रम आणि शिक्षकांशी असलेले नम्र वागणे-बोलणे या सर्व निकषांचा सखोल विचार करूनच या योग्य व गुणवंत विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.
व्यासपीठापर्यंत आकर्षक परेड शाळेतील रेड हाऊस, ग्रीन हाऊस, येलो हाऊस आणि ब्लू हाऊस तसेच विविध हाऊसचे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन तसेच हेड बॉय आणि हेड गर्ल यांनी सुंदर परेड करून पूर्ण शाळेचे लक्ष वेधले.
कर्तव्याची घेतली शपथ
समारंभातील मुख्य आकर्षण असलेल्या शपथविधी दरम्यान, नवनियुक्त विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी आपला उजवा हात पुढे करून शाळा आणि कर्तव्याप्रती निष्ठेची भावपूर्ण शपथ घेतली. प्रचार्य नूतनवर्षा वळवी यांनी विद्यार्थ्यांना ही शपथ दिली, तर विद्यार्थी प्रतिनिधींनी कॅप्टनला शपथ दिली. "मी प्राचार्य, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा आदर करेन. मी सत्य, प्रामाणिकपणा, सहकार्य आणि नेतृत्व या मूल्यांचे पालन करेन. माझ्या शाळेचे नाव आणि प्रतिष्ठा उंचावण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन आणि सोपवलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेन," अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक शपथ घेतली. नेते जन्माला येत नाहीत, ते घडवले जातात"– प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांचे मार्गदर्शन:
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी नवनियुक्त मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ते म्हणाले, "आजचा हा शपथविधी सोहळा केवळ पद स्वीकारण्याचा कार्यक्रम नसून, जबाबदारी, नेतृत्व आणि सेवाभाव स्वीकारण्याचा एक पवित्र क्षण आहे. 'नेते जन्माला येत नाहीत, तर ते घडवले जातात' या उक्तीप्रमाणे तुम्ही सर्वजण देशाचे भावी निर्माते आहात. खरा नेता तोच असतो, जो स्वतः आदर्श वर्तन करतो, इतरांना प्रेरणा देतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सोबत घेऊन पुढे जातो. तुमच्या प्रत्येक कृतीत शिस्त, प्रामाणिकपणा, वेळेचे महत्त्व, नम्रता, उत्तम शिष्टाचार आणि सेवाभाव दिसला पाहिजे." ही घेतलेली शपथ केवळ शब्दांपुरती मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी ती आपल्या दैनंदिन आचरणात उतरवावी, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
या सोहळ्याला व्यासपीठावर उपप्राचार्य विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जाबिंलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात राष्ट्रगीताने करण्यात आली. उपस्थित सर्वांनी नवनियुक्त बाल- मंत्रिमंडळाला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शालेय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा शिक्षक सतिष सदाराव व खुशाल शर्मा यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनिष पाडवी यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*'एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय' येथे "शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथग्रहण सोहळा उत्साहात संपन्न!*
July, 18 2026
*तुळाजा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी*
July, 18 2026
*वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे 1500 हून अधिक सीड बॉल तयार*
July, 18 2026
*शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश,पक्ष संघटनेची ताकद असलेल्यांनाच पद-आ.चंद्रकांत रघुवंशी*
July, 18 2026
*धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी,आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर
July, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज