*तुळाजा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तुळाजा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी*
*तुळाजा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास मगरे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून संदीप मोरे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे
मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले
मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख वक्ते संदीप मोरे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांचे कमी
शिक्षण असताना सुद्धा कथा, कादंबऱ्या, पोवळे तसेच प्रवास वर्णन इ साहित्य निर्माण केले. तसेच श्री तुकाराम भील, सुदाम जांभोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास मगरे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा
या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा
पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांनी संयुक्त महाराष्ट् चळवळीत सहभाग घेतला होता. तसेच त्यांनी लावणी तसेच तमाशा या नाट्य
प्रकाराला लोकनाट्य हे नाव त्याची
प्रतिष्ठा वाढवली. असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज खेडकर यांनी केले तर आभार राहुल साळुंखे यांनी मानले. या कार्यक्रमाला यशस्वी
करण्यासाठी राजेंद्र ढोडरे, विलास पाडवी, संतोष राठोड मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.



