*महावितरणच्या कारभारा विरोधात म.न.से राजापूर तालुका संपर्क अध्यक्ष दत्ताराम दिवाळे यांचा आंदोलनाचा इशारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महावितरणच्या कारभारा विरोधात म.न.से राजापूर तालुका संपर्क अध्यक्ष दत्ताराम दिवाळे यांचा आंदोलनाचा इशारा*
*महावितरणच्या कारभारा विरोधात म.न.से राजापूर तालुका संपर्क अध्यक्ष दत्ताराम दिवाळे यांचा आंदोलनाचा इशारा*
ओणी(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील बहुतांश गावात दिवसातून अनेकदा वीजपुरवठा खंडित होत आहे याचा मोठा फटका विद्यार्थी, शेतकरी यांच्या सोबतच व्यापारी, लघुउद्योजक, रुग्ण तसेच सर्वसामान्य जनतेला बसत आहे जनतेला भेडसावणाऱ्या या महत्त्वाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल असा इशारा संपर्क अध्यक्ष दत्ता दिवाळे यांनी महावितरण राजापूर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. नैसर्गिक आपत्ती, वादळी वारे किंवा अचानक उद्भवणाऱे तांत्रिक बिघाड यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. परंतु पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यांची आवश्यक तपासणी, देखभाल, धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणी, जीर्ण खांब, वीज तारा बदलणे इतर विद्युत साहित्य तातडीने बदलण्यात यावे, प्रत्येक विभागात बिघाड निवारण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग, साहित्य व यंत्रणा उपलब्ध ठेवण्यात यावी, वारंवार बिघाड होणाऱ्या गावांचा स्वतंत्र आढावा घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देऊन शक्य तितक्या कमी वेळात वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. जनतेच्या मुलभूत सुविधांबाबत कोणताही निष्काळजीपणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही या निवेदनाची दखल घेऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी अन्यथा जनतेच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल असा इशारा दिवाळे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.



