*एस.ए.मिशन हायस्कूल येथे जागतिक लोकसंख्या दिन आणि जागतिक संगीत दिन उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एस.ए.मिशन हायस्कूल येथे जागतिक लोकसंख्या दिन आणि जागतिक संगीत दिन उत्साहात संपन्न*
*एस.ए.मिशन हायस्कूल येथे जागतिक लोकसंख्या दिन आणि जागतिक संगीत दिन उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील नामांकित एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 'जागतिक लोकसंख्या दिन' आणि 'जागतिक संगीत दिन' अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात संयुक्तपणे साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे प्रबोधनपर मनोगत, सुमधुर समूहगीते, पपेट शो आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेने या कार्यक्रमात मोठी रंगत आणली, कार्यक्रमाची सुरुवात 'हम को मन की शक्ती देना' या ईशस्तवनाने झाली. तसेच इयत्ता 8 वीच्या विद्यार्थिनींनी 'चला चला एक मुखात' हे समूहगीत आणि पाठ्यपुस्तकातील कविता सुरेल चालीत सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.किरण पाटील यांनी प्रास्ताविकात वाढत्या लोकसंख्येच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीवर होणाऱ्या परिणामांबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले.
विद्यार्थिनी प्रज्ञा पावरा आणि वैष्णवी कदम यांनी दैनंदिन जीवनातील व शिक्षणातील संगीताचे महत्त्व सुंदर उदाहरणांसह स्पष्ट केले, विद्यालयाच्या प्राचार्य सौ. नूतन वर्षा वळवी यांनी स्वतः हार्मोनियमवर उत्कृष्ट वादन केले, तर उपमुख्याध्यापक विजय पवार यांनी बासरीवर अतिशय मधुर धून सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. संगीत शिक्षक प्रसाद दीक्षित यांनी भारतीय व पाश्चात्त्य वाद्यांचे प्रकार आणि संगीताचे मूल्य याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. माजी शिक्षिका मिना सोनेरी यांनी विशेष 'पपेट शो' (बाहुली नाट्य) च्या माध्यमातून मनोरंजनातून विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. विद्यालयात घेतलेल्या 'सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत' प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्राचार्य सौ. नूतन वर्षा वळवी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर प्राचार्य सौ. नूतन वर्षा वळवी, माजी शिक्षिका मिना सोनेरी, उपमुख्याध्यापक विजय पवार आणि पर्यवेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिष पाडवी यांनी केले. शेवटी संगीत शिक्षक प्रसाद दीक्षित यांनी आभार मानले व या यशस्वी सोहळ्याची सांगता झाली.
शाळेच्या या अत्यंत स्तुत्य आणि बहुआयामी उपक्रमाचे सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे.



