*बामखेडा येथील आरोग्य उपकेंद्र येथे विशेष क्षयरोग (टीबी) शोध व निदान शिबिराचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा येथील आरोग्य उपकेंद्र येथे विशेष क्षयरोग (टीबी) शोध व निदान शिबिराचे आयोजन*
*बामखेडा येथील आरोग्य उपकेंद्र येथे विशेष क्षयरोग (टीबी) शोध व निदान शिबिराचे आयोजन*
शहादा(प्रतिनिधी):-जिल्हा क्षयरोग केंद्र, नंदुरबार आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने 'टीबीमुक्त भारत 2026' या संकल्पनेअंतर्गत शहादा तालुक्यातील बामखेडा येथील आरोग्य उपकेंद्र येथे विशेष क्षयरोग (टीबी) शोध व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल 123 नागरिकांची डिजिटल एक्स- रेद्वारे मोफत तपासणी करण्यात आली.
हा उपक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी व प्राथमिक आरोग्य केंद्र वडाळीचे डॉ नारायण बावा यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. 'टीबीमुक्त भारत 2026' या उद्दिष्टपूर्तीसाठी आरोग्य विभागाकडून गावोगावी व पाड्यापाड्यांमध्ये जाऊन नागरिकांचे मोफत एक्स-रेद्वारे टीबी तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. निदान झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार सुरू करून त्यांना पूर्णपणे बरे करण्यावर भर दिला जात आहे. एका टीबी रुग्णामुळे 15 ते 20 जणांना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने वेळेवर निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. या मोहिमेच्या यशासाठी जनसहभाग अत्यंत आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ विजय पावरा, ए एन एम पाठक,एम पी डब्ल्यू अरविंद गायवडे,एसटीएस संजय निकुंभे, वैभव नंदेश्वर, जीएनएम मयुरी गवळे, अनिता शिरसाठ, संजय राठोड आशा वर्कर रंजना गवळे, जया ईशी, शोभा गवळे उपस्थित होते.



