*अलीविहीर अंतर्गत मौजे रामगढ गावास नमुना क्र. 8 व घरपट्टी नोंद करून गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा व शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अलीविहीर अंतर्गत मौजे रामगढ गावास नमुना क्र. 8 व घरपट्टी नोंद करून गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा व शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन*
*अलीविहीर अंतर्गत मौजे रामगढ गावास नमुना क्र. 8 व घरपट्टी नोंद करून गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा व शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अलीविहीर अंतर्गत मौजे रामगढ गावास नमुना क्र. 8 व घरपट्टी नोंद करून गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा व शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अलविहीर अंतर्गत मौजे रामगढ हे गाव ग्रुप ग्रामपंचायत अलीविहीर अंतर्गत असून, गावात अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. मात्र आजपर्यंत गावातील घरांची नियमित घरपट्टी नोंद व ग्रामपंचायत नमुना क्र. 8 मध्ये नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना विविध शासकीय योजना, मूलभूत सुविधा व प्रशासकीय सेवा मिळविण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
ग्रामपंचायतीच्या अभिलेखात घरांची नोंद नसल्यामुळे रस्ते, गटारे, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, घरकुल योजना, कर आकारणी तसेच इतर विकास कामांसाठी आवश्यक शासकीय नोंदी उपलब्ध होत नाहीत. परिणामी गाव विकासापासून वंचित राहत आहे.
कायदेशीर व प्रशासकीय आधार, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 नुसार ग्रामपंचायतीने गावातील मालमत्ता व घरांची नोंद ठेवणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा व अभिलेख नियम नुसार नमुना क्र. 8 मध्ये घरांची व मालमत्तेची नोंद करणे आवश्यक आहे.भारतीय संविधानातील अनुच्छेद 38 व 46 नुसार अनुसूचित जमाती व दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासनाने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
पंचायत राज व्यवस्थेच्या तरतुदीनुसार गावातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.
मौजे रामगढ गावातील सर्व घरांचे सर्वेक्षण करून नमुना क्र. 8 मध्ये तात्काळ नोंद करण्यात यावी.
घरपट्टी नोंदणी करून अधिकृत अभिलेख तयार करण्यात यावेत.
गावातील नागरिकांना घरपट्टी उतारे व आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावीत. गावाला रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, गटारे व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्यात यावी.
संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत.
मौजे रामगढ गावातील नागरिकांना शासनाच्या विकास योजनांचा समान लाभ मिळावा व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.



