*भाजपा उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी व शहादा तळोदयाचे आमदार राजेश पाडवी यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना वाळु वाहतुक व्यवसाय संदर्भात निवेदन देऊन, वाळु वाहतुकीसाठी लागणा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भाजपा उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी व शहादा तळोदयाचे आमदार राजेश पाडवी यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना वाळु वाहतुक व्यवसाय संदर्भात निवेदन देऊन, वाळु वाहतुकीसाठी लागणा
*भाजपा उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी व शहादा तळोदयाचे आमदार राजेश पाडवी यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना वाळु वाहतुक व्यवसाय संदर्भात निवेदन देऊन, वाळु वाहतुकीसाठी लागणारी झिरो रॉयल्टी पास (ETP) सुरु करण्याबाबतची मागणी केली*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भाजपा उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी व शहादा तळोदयाचे आमदार राजेश पाडवी यांनी 30 जुन रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना वाळु वाहतुक व्यवसाय संदर्भात निवेदन देऊन वाळु वाहतुकीसाठी लागणारी झिरो रॉयल्टी पास (ETP) सुरु करण्याबाबतची मागणी केली. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा रेती युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, नंदुरबार जिल्हयालगत गुजरात राज्याची सिमा आहे, आणि तेथे तापीनदी पात्रातुन मोठ्या प्रमाणात नंदुरबार जिल्हयासह महाराष्ट्रात वाळु वाहतुक होत असते, गेल्या काही महिन्यापासुन ETP अर्थात झिरो रॉयल्टी पास उपलब्ध नसल्याने नंदुरबार जिल्हयातील किमान 500 हुन अधिक वाळु वाहतुक धारक ज्यांनी आपल्या उपजिविकेसाठी वाळु वाहतुक व्यवसायासाठी डंपर घेतलेले आहे, अशे व्यवसायिक ETP पास बंद असल्याकारणाने वाळु वाहतुक करता येत नसल्याने सध्या बेरोजगार आहेत. या सगळ्यांनी बँकेतुन कर्ज रुपात वाहने घेतलेली आहेत, काही व्यक्तींनी खाजगी सावकाराकडुन कर्ज घेऊन देखील घेतलेली आहेत. सध्या हा ETP पास नसल्याने वाळु वाहतुक व्यवसाय बंद आहे. त्यामुळे विविध बांधकामांवर त्याचा परीणाम झालेला आहे उदा. अनेक नागरीकांची घरे बांधकाम, विकासात्मक शासकीय बांधकाम सुरु आहेत त्यावर देखील मोठा परीणाम झालेला आहे. याशिवाय ज्या उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन वाहने घेतलेली आहे, त्यांना बँकेचा हफता भरणे देखील अवघड झाले आहे. नंदुरबार जिल्हयापुरता ETP पास सुरु करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.



