*डॉ.गावित हे शेर आहेत, कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही, डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केला ठाम विश्वास*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ.गावित हे शेर आहेत, कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही, डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केला ठाम विश्वास*
*डॉ.गावित हे शेर आहेत, कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही, डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केला ठाम विश्वास*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तत्वाने चालून लोक कल्याण साधणारे राजकारण केले. कोणाचेही वाईट करण्याची शिकवण दिली नाही. तथापि सर्व विरोधक गावित परिवाराच्या विरोधात एकत्र येऊन लढत असले तरी काहीच बिघडत नाही.
शेवटी काहीही झाले तरी नंदुरबार जिल्ह्यात माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हेच एकमेव शेर आहेत, जनता अजूनही त्यांच्या विकास कार्याच्या पाठीशी आहे; अशा शब्दात माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आगामी निवडणुकांमधील विजयाबद्दल ठाम विश्वास व्यक्त केला.
विरोधकांचा समाचार घेताना त्या पुढे म्हणाल्या की, लोकांच्या कामासाठी विकास निधी कसा खर्च करावा हे विद्यमान खासदारांना माहित आहे किंवा नाही? असा प्रश्न लोकांना पडला आहे. अक्कलकुव्यातील स्थानिक आमदारांनाही विकासाचा विसर पडला असून खोट्या तक्रारी आणि खोटे गुन्हे दाखल करण्यात ते मग्न झाले आहेत. अनेक समस्या आणि प्रश्न असताना त्यांनी खोट्या तक्रारी मांडण्यासाठी थेट
विधानसभेचे व्यासपीठ वापरले.
माजी खासदर डॉ. हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकुवा येथील जैन धर्मशाळा सभागृहात आज 30 जुन 2026 वार मंगळवार रोजी भारतीय जनता पार्टी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक मोर्चेबांधणी व पक्ष बळकटीकरण बैठक आणि SIR अभियान बीएलओ-1, बीएलए प्रशिक्षण पार पडले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. आदिवासी बोलीभषेत जनगणना एसआयआरचे महत्व सांगितले.
भाजपाचे अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेश पाडवी, माजी जि.प. सदस्य किरसिंग पाडवी, माजी जि.प. सदस्य प्रतापद वसावे, माजी जि.प. सदस्य नितेश वळवी, महेश तवर, अमृत चौधरी, माजी जि.प. सदस्य जमुना बाई वसावे, सरपंच चंपा पाडवी, सरपंच सौ यमुना पाडवी, उपसरपंच जगदीश वसावे, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक राऊत, धनसिंग वसावे, रोशन गावित आणि अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉक्टर हिना गावित यांनी याप्रसंगी जनगणनेचे महत्व काय? एस आय आर म्हणजे काय? हे आदिवासी बोली भाषेतून विषद केले. योजनांचा लाभ घेण्यासाठी जनगणना अंतर्गत नोंदणी अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रमाणे एस आय आर अंतर्गत मतदार नोंदणी आता नाही केली तर पुढे 20 वर्ष मतदानापासून वंचित रहाल, याचं गांभीर्य नागरिकांना लक्षात आणून द्या; असे आवाहन केले. ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा विधानसभा कोणत्याही क्षेत्रातील भाजपा कार्यकर्ता असो त्यांची ही जबाबदारी आहे; असेही त्यांनी सांगितले. तारांकित प्रश्न मांडून आमदार कोणता विकास करताहेत?
भाजपाचे अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेश पाडवी, माजी जि.प. सदस्य किरसिंग पाडवी, माजी जि.प. सदस्य प्रताप वसावे, माजी जि.प. सदस्य नितेश वळवी यांनी देखील आपल्या भाषणातून एसआर जनगणना याचे महत्त्व विशद करण्याबरोबरच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि अक्कलकुव्यातील विरोधी आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. शाळा दवाखाना रस्ते या सदर्भाने विकास कार्य करण्याऐवजी प्रत्येकाच्या विरोधात तारांकित प्रश्न लावण्याचा सपाटा लावून आणि एकापाठोपाठ अनेक जणांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याने तसेच अविश्वास दाखल करण्याने ते कोणता विकास करीत आहेत? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.



