*आयान मल्टीट्रेड एल.एल. पी. युनिट नं-1 समशेरपुर ता. जि. नंदुरबार, गळीत हंगाम-2025-26 मधील एकुण 5120 शेतकऱ्यांना 100% केन पेमेंट रक्कम रु.205 कोटी अदा. शेतकऱ्यांकडुन समाधान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आयान मल्टीट्रेड एल.एल. पी. युनिट नं-1 समशेरपुर ता. जि. नंदुरबार, गळीत हंगाम-2025-26 मधील एकुण 5120 शेतकऱ्यांना 100% केन पेमेंट रक्कम रु.205 कोटी अदा. शेतकऱ्यांकडुन समाधान*
*आयान मल्टीट्रेड एल.एल. पी. युनिट नं-1 समशेरपुर ता. जि. नंदुरबार, गळीत हंगाम-2025-26 मधील एकुण 5120 शेतकऱ्यांना 100% केन पेमेंट रक्कम रु.205 कोटी अदा. शेतकऱ्यांकडुन समाधान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आयान साखर कारखान्याने सन- 2025-26 मध्ये गळीतास आलेल्या उसासाठी एकुण रक्कम रु.205 कोटी 100% केन पेमेंट 5120 शेतकऱ्यांना वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांनी दिली. मागील 15 वर्षात आपण कारखान्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये खुप मोलाची साथ दिलेली आहे. त्यामुळे गाळप क्षमता वाढवुन भागातील संपुर्ण ऊसाचे वेळेत गाळप होत आहे. त्यासाठी आयान नेहमीच कटिबध्द आहे. कारखान्याच्या माध्यमातुन भागाची मोठया प्रमाणावर आर्थिक उलाढाल होऊन उस या शाश्वत पिकाची खात्री निर्माण झालेली आहे. मागील दोन वर्षात इथेनॉल धोरण यामुळे शेतकऱ्यांच्या केन पेमेंट व ऊस तोडणी व वाहतुक पेमेंट साठी विलंब झाला परिणामी यावर्षी देखील युध्दजन्य परिस्थितीमुळे इथेनॉल कोटा कमी मिळाला त्यामुळे इथेनॉल विक्री न झाल्याने साठा पडुन राहिला त्यांची आर्थिक झळ यावर्षी देखील सोसावी लागली. तरी देखील कारखान्याने शासनाची एफ. आर.पी.रु.2552 प्रति टन असताना त्यापेक्षा जास्त दराने 15 जानेवारी पर्यत रु.2800 व 15 जानेवारी नंतर रु.2850 प्रति टन प्रमाणे एकुण 5120 शेतकऱ्यांना एकुण रक्कम रु.205 कोटी 100% रक्कम अदा केलेले आहेत. आज रोजी कुठल्याही शेतकऱ्यांची देय बाकी नाही. उपरोक्त अडचणी मुळे पेमेंटसाठी उशिर झाला याची खंत व्यवस्थापनाला आहे. यापुढच्या काळात दिलेल्या वेळेत पेमेंट देण्यासाठी कटिबध्द आहोत अशी खात्री या माध्यमातून देत आहोत. तसेच आयान शुगर यापुढे अधिक सक्षमपणे चालेल अशी माहिती देण्यात आली.
येणारे गळीत हंगामासाठी कारखान्याची कामे चालु असुन पावसाची परिस्थिती विचारात घेता वेळेत चालु होईल. कारखान्याकडे 15 हजार हेक्टर उसाची नोंद असुन नोंदी दुबार तपासणीचे काम चालु आहे. आपल्या नोंदी तपासुन घ्याव्यात. उस क्षेत्रात वाढ झाली असली तरी वेळेत उसाचे गाळप करण्यात येईल.कारखान्याने आताच्या चालु लागवडीसाठी उधारिने उस बेणे व प्रेसमड (मळी) उपलब्ध करुन दिले असुन उपलब्ध करुन दिलेल्या को-86032, को-11015 को-8005, को-100001अशा चांगल्या उसाच्या जातीची लागवड करुन त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व लागवड केल्याबरोबर वेळीच नोंद करण्याचे आवाहन संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे.



