*विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 29 जुलै पर्यंत बीएलओ करणार घरभेटी, मतदारांनी सहकार्य करावे; राजकीय पक्ष व बीएलएंनी सक्रिय सहभाग नोंदवावा-कल्पना ठुबे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 29 जुलै पर्यंत बीएलओ करणार घरभेटी, मतदारांनी सहकार्य करावे; राजकीय पक्ष व बीएलएंनी सक्रिय सहभाग नोंदवावा-कल्पना ठुबे*
*विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 29 जुलै पर्यंत बीएलओ करणार घरभेटी, मतदारांनी सहकार्य करावे; राजकीय पक्ष व बीएलएंनी सक्रिय सहभाग नोंदवावा-कल्पना ठुबे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचूक, अद्ययावत व त्रुटीरहित मतदार यादी तयार करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर)–2026 राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आजपासून ( 30 जून ते 29 जुलै, 2026) या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांच्या घरोघरी भेट देणार असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कल्पना ठुबे यांनी केले आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन मतदार यादीतील माहितीची पडताळणी करणार आहेत. मतदार यादीतील माहिती अचूक, अद्ययावत व त्रुटीरहित राहण्यासाठी नागरिकांनी आवश्यक माहिती उपलब्ध करून देत बीएलओंना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती ठुबे यांनी केले आहे.तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त व नोंदणीकृत राजकीय पक्ष तसेच त्यांच्या नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांनी (बीएलए) या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही श्रीमती ठुबे यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी बीएलए-2 यांची नियुक्ती करून त्याबाबतची माहिती निवडणूक शाखेकडे सादर करावी. आपल्या कार्यक्षेत्रातील बीएलओंसोबत समन्वय साधून घरभेटीदरम्यान मतदार यादीच्या पडताळणीच्या कार्यात सहकार्य करावे. तसेच कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही आणि अपात्र अथवा मृत मतदारांची नावे मतदार यादीत राहणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी प्रशासनाला पारदर्शकपणे सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. सुदृढ लोकशाही व्यवस्थेसाठी अचूक व विश्वासार्ह मतदार यादी हा मुख्य पाया आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून जिल्हा निवडणूक प्रशासनाला मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कल्पना ठुबे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



