*प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी अर्ज करण्याचे आवाहन, 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी अर्ज करण्याचे आवाहन, 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत*
*प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी अर्ज करण्याचे आवाहन, 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत दरवर्षी दिला जाणारा मानाचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026’ (PMRBP) जाहीर करण्यात आला असून, या पुरस्कारासाठी पात्र व शूर मुलांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांनी या पुरस्कारासाठी नामांकन नोंदवावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. हा पुरस्कार शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंगजी यांचे धाकटे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेहसिंग यांच्या अद्वितीय शौर्याला आणि सर्वोच्च बलिदानाला आदरांजली म्हणून दिला जातो. 26 डिसेंबर 1705 रोजी वयाच्या अवघ्या 9 आणि 6 व्या वर्षी त्यांनी देशासाठी महान शौर्य दाखवले होते. त्यांच्या याच स्मृती प्रित्यर्थ देशातील शूर व होतकरू बालकांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
पुरस्कारासाठीची पात्रता आणि क्षेत्रे: क्षेत्र: ज्या मुलांनी शिक्षण, कला/सांस्कृतिक (गायन आणि वाद्य), खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य, पर्यावरण आणि शौर्य अशा विविध क्षेत्रांत विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या बालकाचे वय 31 जुलै 2026 रोजी 5 वर्षांपेक्षा अधिक आणि 18 वर्षांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे.
अर्ज करण्याची पद्धत व मुदत: या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून ती पात्र उमेदवारांनी https://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच आपले ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2026 पर्यंत असून, केवळ या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन नामांकनांचाच विचार केला जाईल. संकेत स्थळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून (ऑफलाईन किंवा टपालाने) आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पुरस्काराविषयीची सविस्तर माहिती आणि अटी वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील सर्व पात्र व गुणवान मुलांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करावेत, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पाटील यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



