*नंदुरबार येथे राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा, अचूक माहितीद्वारे डेटा-आधारित सुशासनाचा संकल्प,"प्रशासकीय माहितीची क्षमता उलगडणे" या संकल्पनेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा, अचूक माहितीद्वारे डेटा-आधारित सुशासनाचा संकल्प,"प्रशासकीय माहितीची क्षमता उलगडणे" या संकल्पनेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन*
*नंदुरबार येथे राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा, अचूक माहितीद्वारे डेटा-आधारित सुशासनाचा संकल्प,"प्रशासकीय माहितीची क्षमता उलगडणे" या संकल्पनेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महान भारतीय सांख्यिकी तज्ज्ञ प्रा. प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सांख्यिकी दिन 2026 उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी ‘प्रशासकीय माहितीची क्षमता उलगडणे’ ("Unlocking the Potential of Administrative Data") ही मुख्य संकल्पना ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा सांख्यिकी उपसंचालक वि.गु. धनगर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रारंभी प्रा. पी. सी. महालनोबिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात वक्त्यांनी प्रा. महालनोबिस यांच्या भारतीय सांख्यिकी क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा गौरव केला. त्यांनी स्थापन केलेली 'भारतीय सांख्यिकी संस्था' ('Indian Statistical Institute') आणि त्यांनी विकसित केलेले 'महालनोबिस अंतर' (Mahala Nobis Distance) हे सांख्यिकी तंत्र आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स क्षेत्रात प्रभावी ठरत असल्याचे सांगितले. देशाच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करून त्यांनी औद्योगिकीकरणावर आधारित विकास मॉडेलची संकल्पना मांडली व वैज्ञानिक नियोजनाची पायाभरणी केली.
यावेळी मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, शासनाच्या विविध विभागांकडून दैनंदिन कामकाजातून निर्माण होणारा प्रशासकीय डेटा हाच विकास नियोजनाचा मुख्य आधार आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, महसूल, ग्रामविकास व रोजगार यांसारख्या क्षेत्रातील नियमितपणे संकलित होणाऱ्या माहितीचा प्रभावी वापर केल्यास शासन अधिक अचूक, पारदर्शक व परिणामकारक निर्णय घेऊ शकते. नंदुरबार जिल्ह्याचा आकांक्षी जिल्हा व आकांक्षी तालुका कार्यक्रम, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी हा डेटा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. अद्ययावत माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाला विकासातील तफावत ओळखून संसाधनांचे योग्य नियोजन करता येते. शेवटी, "उत्तम माहिती, उत्तम निर्णय, उत्तम प्रशासन" ("Better Data, Better Decisions, Better Governance") हा संदेश देत जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अचूक, विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण माहिती संकलित करण्याचा आणि डेटा-आधारित सुशासनाला बळकटी देण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास दोन्ही कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



