ताजा खबरे:
*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*
*महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील महत्त्वाचे मुद्दे*
*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
*शिक्षणाला प्रोत्साहन, सह्याद्री कुणबी संघ-कोथरुड विभागाचा स्तुत्य उपक्रम*
*शाळा प्रवेशोत्सव दिनी “वाचावी अशी पुस्तके” समूहाचा ज्ञानदानाचा प्रेरणादायी उपक्रम*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शाळा प्रवेशोत्सव दिनी “वाचावी अशी पुस्तके” समूहाचा ज्ञानदानाचा प्रेरणादायी उपक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शाळा प्रवेशोत्सव दिनी “वाचावी अशी पुस्तके” समूहाचा ज्ञानदानाचा प्रेरणादायी उपक्रम*

  • Share:

*शाळा प्रवेशोत्सव दिनी “वाचावी अशी पुस्तके” समूहाचा ज्ञानदानाचा प्रेरणादायी उपक्रम*
पांगरी(प्रतिनिधी):-शाळा प्रवेशोत्सव दिनाचे औचित्य साधून दि. 15 जून 2026 रोजी “वाचावी अशी पुस्तके” समूह, मुंबई यांच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा पांगरी क्र. 2 ता. संगमेश्वर येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष ज्ञानदान उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेच्या वाचनालयाला 12 दर्जेदार मराठी पुस्तकांचा संच भेटस्वरूपात प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, दर्जेदार साहित्याची ओळख व्हावी आणि वाचन संस्कृती अधिक समृद्ध व्हावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. भेट देण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये श्रीमान योगी, ययाती, स्वामी, श्यामची आई, अग्निपंख, एक होता कार्व्हर, एरंडाचे गुऱ्हाळ यांसारख्या मराठी साहित्यविश्वातील मान्यवर साहित्यकृतींसह एकूण 12 पुस्तकांचा समावेश आहे. “वाचावी अशी पुस्तके” हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत उत्तम साहित्य पोहोचवण्याच्या आणि वाचन संस्कृती जपण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला असून, त्यातून विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची अमूल्य भेट देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे माजी विद्यार्थी अक्षय म्हादे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमास पांगरी गावचे सरपंच सुनील म्हादे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश गोताड, दीपक पानगले, मंगेश म्हादे, आबा पानगले, शाळेचे मुख्याध्यापक  जाधव, शिक्षकवृंद, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या डिजिटल युगात मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि ती टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. पुस्तके विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच देत नाहीत तर त्यांच्यामध्ये विचारशक्ती, संस्कार, सर्जनशीलता आणि जीवन मूल्यांचीही जपणूक करतात. त्यामुळे अशा उपक्रमांचे सामाजिक आणि शैक्षणिक महत्त्व अधिक अधोरेखित होते. “वाचावी अशी पुस्तके” समूहाला मिळणारा वाचकांचा प्रेमळ प्रतिसाद आणि सहकार्य हेच या कार्यामागील खरे बळ आहे. भविष्यातही अधिकाधिक शाळांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचवण्याचा समूहाचा संकल्प असून, अधिकाधिक वाचनप्रेमींनी या ज्ञानयज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन समूहाच्या वतीने करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*
June, 19 2026
*महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील महत्त्वाचे मुद्दे*
June, 19 2026
*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
June, 19 2026
*शिक्षणाला प्रोत्साहन, सह्याद्री कुणबी संघ-कोथरुड विभागाचा स्तुत्य उपक्रम*
June, 19 2026
*शाळा प्रवेशोत्सव दिनी “वाचावी अशी पुस्तके” समूहाचा ज्ञानदानाचा प्रेरणादायी उपक्रम*
June, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज