*एकल महिलांसाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण, सूचना आणि अभिप्रायांचे पाठविण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकल महिलांसाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण, सूचना आणि अभिप्रायांचे पाठविण्याचे आवाहन*
*एकल महिलांसाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण, सूचना आणि अभिप्रायांचे पाठविण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर, आरोग्यविषयक व पुनर्वसनसंदर्भातील प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्याचा निर्णय महिला व बाल विकास विभागाने घेतला आहे. या अनुषंगाने एकल महिला धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख व वास्तववादी करण्याच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याकडून विविध मुद्द्यांवर अभिप्राय व सूचना मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
या मुद्द्यांवर देता येतील सूचना व अभिप्राय: रोजगार व उपजीविका विषयक सूचना
मालमत्ता व वारसा हक्क विषयक सूचना,अपत्यांच्या शिक्षण विषयक सूचना निवारा व पुनर्वसन विषयक सूचना शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा विषयक सूचना, नवीन योजना व उपक्रमांविषयी अपेक्षा, कायदेशीर अडचणी, पोटगी, न्यायालयीन दिरंगाई व प्रलंबित खटल्यांमध्ये सुधारणा, एकल महिलांच्या सुरक्षितते विषयी सूचना, सामाजिक सहभाग वाढविणे व रुढी- परंपरांमधील अडथळे दूर करण्यासंबंधी सूचना अभिप्राय सादर करण्याचा नमुना: नागरिक व तज्ज्ञ व्यक्तींना वरीलपैकी ज्या क्षेत्राचे ज्ञान किंवा माहिती असेल, त्यांनी आपले अभिप्राय देणे आवश्यक आहे. मुद्दा, सध्याची अडचण व सुचविलेली उपाययोजना/सुधारणा. याप्रमाणे अभिप्राय देण्यात यावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी आणि अभ्यासकांनी एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपले मौल्यवान अभिप्राय व सूचना विहित मुदतीत इच्छुकांनी 22 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत प्रत्यक्ष जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे सादर करावेत. तसेच, wcdnandurbar@gmail.com या ईमेलवर किंवा 9421520669 या व्हॉट्सॲप (WhatsApp) क्रमांकावरही पाठवता येतील, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.



