*नवापूर येथे आज 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन, टेक्सटाईल क्षेत्रात 82 पेक्षा जास्त जागांसाठी भरती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापूर येथे आज 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन, टेक्सटाईल क्षेत्रात 82 पेक्षा जास्त जागांसाठी भरती*
*नवापूर येथे आज 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन, टेक्सटाईल क्षेत्रात 82 पेक्षा जास्त जागांसाठी भरती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज 19 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नवापूर, येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा प्रामुख्याने 'टेक्सटाईल क्षेत्रासाठी' (वस्त्रोद्योग) असणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या रोजगार मेळाव्यात नवापूर येथील विविध नामांकित आणि इच्छुक कापड उद्योग (टेक्सटाईल) कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने: श्री मारुती टेक्सटाईल, समता टेक्सटाईल प्रा. लि.,गोदावरी सिल्क मिल प्रा. लि.,मधुसुदन प्रा. लि. ,अदित्या सिनथेटिक ,लक्ष्मी फॅब्रिकेशन प्रा. लि., महावीर टेक्सटाईल, मंगल क्रिएशन, जिनमाता टेक्सटाईल व श्याम फॅब्रिक या सर्व कंपन्या मेळाव्यात थेट सहभागी होऊन त्यांच्याकडील 82 पेक्षा जास्त रिक्त पदांवर उमेदवारांची निवड करणार आहेत.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि रोजगाराची संधी मिळवावी, असेही आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



