*हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या, विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या, विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
*हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या, विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गाची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सध्या कार्यरत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाअंतर्गत 'हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ' (उपकंपनी) स्थापन करण्यात आली आहे. शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या या महामंडळाच्या वतीने सन 2026 -27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा कार्यालयास विविध योजनांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.टी. बागुल यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. हिंदू खाटीक समाजातील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासन निर्णयान्वये 15 ऑक्टोबर 2024 रोजी या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळामार्फत प्रामुख्याने बँकेच्या माध्यमातून 50 टक्के अनुदान योजना, बीजभांडवल योजना आणि थेट कर्ज योजना अशा तीन योजना राबविल्या जातात.
वर्ष 2026-27 साठी नंदुरबार जिल्ह्यासाठी 50 टक्के अनुदान योजना: 01 लाभार्थी, बीजभांडवल योजना: 01 लाभार्थी, थेट कर्ज योजना: 02 लाभार्थी, एनएसएफडीसी (NSFDC) मुदती कर्ज योजना: 01 लाभार्थी, व एनएसएफडीसी (NSFDC) सूक्ष्म पतपुरवठा योजना: 01 लाभार्थी उद्दिष्ट देण्यात आले आहे. या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी हिंदू खाटीक समाजातील जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद समोर, टोकरतलाव रोड, नंदुरबार" येथील महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी. तेथे जाऊन आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह आपला कर्ज मागणीचा अर्ज सादर करावा, असेही महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.टी. बागुल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



