*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात स्व.जयंतराव नटावदकर जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात स्व.जयंतराव नटावदकर जयंती साजरी*
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात स्व.जयंतराव नटावदकर जयंती साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कै.जयंत नटावदकरांनी समाजाच्या उत्थानासाठी केलेले कार्य हे मोठे असून ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन एकलव्य विद्यालयाचे उपशिक्षक धोंडिराम शिनगर यांनी स्व. जयंत नटावदकर जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलताना केले.यावेळी त्यांनी पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाच्या स्थापनेची पार्श्वभूमी देखील सांगितली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.गिरीश पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात बाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश चौधरी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी स्व.बाबांच्या जीवनकार्याची माहिती दिली. आभार प्रदर्शन प्रा.मीनल वसावे यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रा.चंद्रकांत देसले यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयांतील प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



