*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉक्टर हिना गावित यांनी मांडला आढावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉक्टर हिना गावित यांनी मांडला आढावा*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉक्टर हिना गावित यांनी मांडला आढावा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुंबई येथे 18 जून 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी संसदीय संकुल विकास परियोजना अंतर्गत झालेल्या विकासाची वाटचाल, कार्य, उपलब्धी आणि भविष्यातील दिशा या संदर्भाने सविस्तर माहिती सादर केली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सह संघटक या व्ही. सतिष, डॉ. गजानन डांगे, डॉ. हेमंत सावरा यांच्यासह मान्यवर खासदार आणि पक्षाचे वरिष्ठ उपस्थित होते.
माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रयत्नातून नंदुरबार तालुक्यातील नटावद आणि लगतच्या दहा गावांमध्ये संसदीय संकुल विकास परियोजना राबवली जात आहे. त्या अंतर्गत दहा गावांमधील शेतकऱ्यांसाठी गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, फर्म बंडिंग, नाला खोलीकरण, विविध फळे भाज्या लागवड करणे, महिलांच्या सक्षमीकरण आणि तरुणांना रोजगार देणारे उपक्रम राबवले जात असून 18 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीत डॉक्टर हिना गावित यांनी सविस्तर माहिती दिली. आदिवासी भागातील विकास कार्य या माध्यमातून व्यापक होत असल्याबद्दल उपस्थित वरिष्ठांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.