ताजा खबरे:
*नवापूर येथे आज 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन, टेक्सटाईल क्षेत्रात 82 पेक्षा जास्त जागांसाठी भरती*
*हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या, विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
*नंदुरबार प्रकल्पातील 7 आश्रमशाळांमध्ये 11 वी व 12 वीचे वर्ग सुरू, पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रवेश घ्यावा*
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेसाठी, जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज करावे*
*जिल्हा संस्था तपासणी समितीवर अशासकीय सदस्यांची निवड, 25 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*फुले समृद्ध ग्राम श्रावणी येथे खरीप हंगामपूर्व संवादमध्ये खेती बचाव अभिनयाला उत्स्फूर्त प्रतिसाद*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*फुले समृद्ध ग्राम श्रावणी येथे खरीप हंगामपूर्व संवादमध्ये खेती बचाव अभिनयाला उत्स्फूर्त प्रतिसाद*

  • Share:

*फुले समृद्ध ग्राम श्रावणी येथे खरीप हंगामपूर्व संवादमध्ये खेती बचाव अभिनयाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रव्यापी “खेत बचाओ अभियान” अंतर्गत फुले समृद्ध गाव श्रावणी येथे खरीप पूर्व हंगाम बैठकीचे आयोजन व खेती बचाओ अभियान वर कार्यक्रम संपन्न झाला, या प्रसंगी मृदा आरोग्य, मृदा संवर्धन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, मृदा परीक्षणाचे महत्त्व, नैसर्गिक शेती, तसेच शाश्वत कृषी पद्धतींचा प्रसार तसेच फुले समृद्ध ग्राम या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.मोनिका संदीप कोकणी सरपंच श्रावणी होत्या, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. यू.बी. होले, सहयोगी अधिष्ठाता,  कृषी महाविद्यालय नंदुरबार तर प्रमुख अतिथी दीपक पटेल, प्रकल्प संचालक, आत्मा, नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कडधान्य प्रकल्पाचे प्राध्यापक डॉ महेश भारती, प्रमुख मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यु डी पाटील, सौ आरती देशमुख, डॉ खुशाल राठोड व प्रवीण चव्हाण उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी समृद्धी गाव याची माहिती दिली आणि शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये पिकाचे नियोजन व्यवस्थित करावे आणि नवीन वाण आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असे सांगितले. दीपक पटेल यांनी खरीप हंगामात काळजीपूर्वक नियोजन करावे असे आवाहन केले आणि तूर आणि सोयाबीन लागवडीचे महत्त्व विशद केले. बदलत्या हवामान परिस्थितीत कडधान्य ही कमी खर्चिक, पोषणमूल्यांनी समृद्ध आणि शाश्वत पर्याय असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर त्यांची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबारचे उमेश पाटील शास्त्रज्ञ यांनी मृदा परीक्षणाचे महत्त्व, मातीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, मृदा आरोग्य पत्रिकेचा प्रभावी वापर तसेच शास्त्रीय अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे उत्पादन खर्च कमी करून पीक उत्पादकता वाढविण्याचे नैसर्गिक शेती व खरीप हंगामातील नियोजन व उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याने नियमित मृदा परीक्षण करून शिफारशीनुसार खतांचा वापर करावा, तसेच खेती बचाव अभियानबाबत उपस्थित शेतकऱ्यांना जागृत केले. सौ. आरती देशमुख, शास्त्रज्ञ(गृहविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी “खेत बचाओ अभियान” ची उद्दिष्टे, मृदा आरोग्याचे संवर्धन आणि शाश्वत शेतीचे महत्त्व याविषयी माहिती दिली. त्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगांमधील संधींबाबत मार्गदर्शन करत शेतमालाचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगांकडे वळल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते, असे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ खुशाल राठोड शास्त्रज्ञ पशुसंवर्धन यांनी सध्याच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोंबडी पालन बकरी पालन चाऱ्याचे नियोजन पशुधन याविषयी सविस्तर माहिती दिली आणि बांधावर चारा लागवड करून त्याचे महत्त्व पटवून दिले डॉ महेश भारती यांनी तूर पिकावरील लागवड तंत्रज्ञाना व एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच बीजप्रक्रियेचे प्रत्यक्षात प्रत्याक्षात  करून दाखविले,
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ यू. बी. होले यांनी खरीप हंगामातील घ्यावयाच्या काळजी वातावरण बदलाचे परिणाम कृषी क्षेत्रावर कसे परिणाम करतात विद्यापीठाचे तंत्रज्ञानाचा जर वापर केला येत्या कमी पावसावर कशा पद्धतीने पिकाचे उत्पादन घ्यायचे यावर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले भगवान गावाची निवड समृद्धी व्हिलेज म्हणून झाली यावर त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील प्रगतशील शेतकरी  संदीप कोकणी  यांनी आपल्या मनोगतात “खेत बचाओ अभियान” अंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले. मृदा आरोग्य, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पशुसंवर्धन आणि शाश्वत शेतीविषयक मिळालेली माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही अशा प्रकारचे शेतकरी हिताचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. मृदा आरोग्य संवर्धन, रासायनिक खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय व जैविक पर्यायांचा अवलंब तसेच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन याबाबत शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आपल्या गावांमध्ये मृदा परीक्षण, मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये “खेत बचाओ अभियान” विषयी जागरूकता निर्माण होऊन मृदा आरोग्य आणि शाश्वत शेतीबाबत सामुदायिक सहभाग अधिक बळकट झाला. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी महिलांना परसबागेच्या बियाण्याची किट वितरित करण्यात आली तसेच कडधान्य सुधार प्रकल्पातील तूर पिकातील आद्यरेखा प्रात्यक्षिके बियाणे व माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री निर्मल गावित यांनी केले, या कार्यक्रमास गांवातील व परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व या प्रसंगी गावाला समृद्ध ग्राम करण्याचे आस्वासन  उपस्थित शेतकऱ्यांनी दिले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नवापूर येथे आज 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन, टेक्सटाईल क्षेत्रात 82 पेक्षा जास्त जागांसाठी भरती*
June, 18 2026
*हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या, विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
June, 18 2026
*नंदुरबार प्रकल्पातील 7 आश्रमशाळांमध्ये 11 वी व 12 वीचे वर्ग सुरू, पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रवेश घ्यावा*
June, 18 2026
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेसाठी, जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज करावे*
June, 18 2026
*जिल्हा संस्था तपासणी समितीवर अशासकीय सदस्यांची निवड, 25 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
June, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज