*रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास असे बोलणारे राजापूर विकास युवा संघाचे अध्यक्ष मधुकर गोमणे यांनी तालुक्यातिल जिल्हा परिषद केंद्र शाळा रायपाटण नंबर 1 मध्ये शैक्षणिक वस्तूंचे वाटप केले. समाज कार्य करताना सामाजिक बांधिलकी म्हणून या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. मधूकर गोमणे यांनी अनेक वर्षापासून सामाजिक कार्याचा घेतलेला वसा अजून पर्यंत चालूच ठेवला आहे. त्यांनी आपले राजापूर तालुक्याचे विकासाच्या बाबातित हाती घेतलेले स्वप्न कायम स्वरूपि राखत ठेवले आहे. ते तालुक्यातिल अनेक शाळेना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात. गरजू मुलांना अनेक वस्तू देत असतात. त्यांचे दुसरे स्वप्न म्हणजे इथल्या शेतकर्यांने शेती केली पाहीजे सिंचनाखाली जमिन आली पाहीजे. अनेक लागवडी केल्या पाहिजेत. ऊस केला पाहीजे फळझाडे, लावली पाहिजेत, पालेभाज्या, केल्या पाहिजे, ओलिताखाली जमिन आली पाहिजे. अशा अनेक त्यांच्या संकल्पना आहेत. त्यासाठी लागनारी मदत सुद्धा ते करत असतात.
इथला बळीराजा सक्षम झाला पाहिजे कुणाच्या जिवावर अवलंबून नसावा. कोकणातली सर्व पिके इथला शेतकरी घेण्यास सज्ज असला पाहिजे. तो शेतकरी परजिवी नसावा स्वावलंबी बनावा अशी संकल्पना त्यांनी मणाशी धरून राजापूर तालुक्याचा कायापालट झाला पाहीजे आणि विकास झाला पाहिजे अशी त्यांनी आपल्या हाती संकल्पना घेतली आहे. केंद्र शाळा रायपाटण मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करताना सर्व मुलांचे स्वागत केले. आणि आपल्या स्व: हाताने वाटप करत या वेळी मधुकर गोमणे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या वेळी शांताराम रोगे, रायपाटणचे माजी सरपंच संदीप कोलते, सुदेश कोलते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर गुरव, विनायक निखार्गे, विठ्ठल गिरकर, अन्य गावातिल ग्रामस्थ व सर्व शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ. दिपाली धावडे यांनी केले. तर आभार सौ. माने यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



