*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*
*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील
अणसुरे गावातील माध्यमिक शाळेतील इयत्ता
8 वी ते 10 वीचे वर्ग आणि शिक्षकांचे करण्यात आलेले समायोजन तातडीने रद्द करून शाळा पूर्ववत सुरू करावी, अशी ठाम मागणी पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अणसुरे गावाच्या पाच किलोमीटर परिसरात दुसरी कोणतीही माध्यमिक शाळा उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोज लांबचा प्रवास करणे भाग पडत असून अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला असल्याचे पालकांनी नमूद केले आहे. पालकांचे म्हणणे आहे की, शिक्षण हक्क कायदा (RTE) तसेच शासनाच्या संबंधित निर्णयांनुसार पाच किलोमीटर परिसरात पर्यायी माध्यमिक शाळा उपलब्ध नसताना शिक्षकांचे समायोजन करणे योग्य नाही. त्यामुळे प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे. आमची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, हीच आमची अपेक्षा आहे. शाळा बंद पडल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे इयत्ता आठवीसाठी किमान एक शिक्षक आणि नववी दहावीसाठी तीन शिक्षक तातडीने उपलब्ध करून देऊन शाळा सुरू ठेवावी," अशी मागणी पालकांनी केली आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या संयुक्त स्वाक्षरीने शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाने योग्य वेळी दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे. "शाळा वाचवा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा" अशी मागणी आता अणसुरे ग्रामस्थांनी लावून धरली आहे.



