*श्रॉफ हायस्कूलमध्ये 'मिशन फॉर लाईफ' अंतर्गत पर्यावरण संवर्धन पंधरवड्याचा प्रारंभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रॉफ हायस्कूलमध्ये 'मिशन फॉर लाईफ' अंतर्गत पर्यावरण संवर्धन पंधरवड्याचा प्रारंभ*
*श्रॉफ हायस्कूलमध्ये 'मिशन फॉर लाईफ' अंतर्गत पर्यावरण संवर्धन पंधरवड्याचा प्रारंभ*
नंदूरबार(प्रतिनिधी):-श्रॉफ हायस्कूलमध्ये इको क्लबच्या वतीने 'मिशन फॉर लाईफ' अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन पंधरवडा उत्साहात राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याच्या निमित्ताने प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यालयात पर्यावरण संरक्षण शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सदस्य पार्थ देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर इको क्लबचे समन्वयक किशोर रौंदळ यांनी इको क्लबमार्फत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. संस्थेच्या समन्वयिका सुषमा शहा यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची सामूहिक शपथ घेतली. प्लास्टिकचा कमी वापर, वृक्षसंवर्धन, पाणी बचत आणि स्वच्छ परिसर राखणे यांसारख्या पर्यावरणपूरक कृतींचे पालन करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बागुल, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी तसेच पर्यवेक्षिका सीमा पाटील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी जोपासाव्यात, असे मार्गदर्शन केले.
पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या पंधरवड्यात विविध उपक्रम, स्पर्धा आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती विद्यालयाच्या वतीने देण्यात आली.



