*उमरी शहरात मटका व्यवसाय बोकाळला,पोलीस यंत्रणेचे मौन?*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उमरी शहरात मटका व्यवसाय बोकाळला,पोलीस यंत्रणेचे मौन?*
*उमरी शहरात मटका व्यवसाय बोकाळला,पोलीस यंत्रणेचे मौन?*
नांदेड(प्रतिनिधी):-नांदेडच्या उमरी तालुका शहरात अवैध मटका व्यवसायाने पुन्हा डोके वर काढले असून येथील मच्छी मार्केटसह शिवाजी चौक परीसरासह अन्य काही भागांत खुलेआम मटका बुक्की सुरू असल्याचे उघडपणे दिसून येते. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे बोलले जात असताना पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार अवैध मटका अड्ड्यांविरोधात अनेकदा तक्रारी करूनही कारवाई केवळ कागदोपत्रीच होत असल्याचा आरोप आहे. काही वेळा धाडसत्र राबविल्याचे दाखवले जात नाही कधीतरी जुजबी कारवाई केल्याचा फार्स दिसतो पुन्हा व्यवसाय पूर्ववत सुरू होत असते कारवाईची गंभीरता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
शहरातील तथाकथित मटका किंग ला राजकीय पाठबळ तसेच संरक्षण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळेच संबंधित चालक निर्भयपणे अवैध व्यवसाय चालवत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी कायद्याचा धाक संपला आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, अवैध मटक्याच्या विळख्यात युवक वर्ग मोठ्या प्रमाणात अडकत असून अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. झटपट पैशांच्या मोहापायी अनेक तरुण व्यसनाधीन मानसिकतेकडे वळत असल्याने सामाजिक प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.
दरम्यान, शहरातील अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत असून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित मटका चालक, त्यांना संरक्षण देणारे घटक आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.



