ताजा खबरे:
*शेतीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी निगदी धडगाव “खेत बचाओ अभियान”ची जनजागृती*
*श्रॉफ हायस्कूलमध्ये 'मिशन फॉर लाईफ' अंतर्गत पर्यावरण संवर्धन पंधरवड्याचा प्रारंभ*
*उमरी शहरात मटका व्यवसाय बोकाळला,पोलीस यंत्रणेचे मौन?*
*ज्येष्ठ नागरिकांमुळे कुटुंबावर चांगले संस्कार घडतात- पो.नि.हेमंत पाटील*
*नंदुरबार येथे चित्रकथी-हरदास समाजाच्या जात वैधता प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ज्येष्ठ नागरिकांमुळे कुटुंबावर चांगले संस्कार घडतात- पो.नि.हेमंत पाटील*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ज्येष्ठ नागरिकांमुळे कुटुंबावर चांगले संस्कार घडतात- पो.नि.हेमंत पाटील*

  • Share:

*ज्येष्ठ नागरिकांमुळे कुटुंबावर चांगले संस्कार घडतात- पो.नि.हेमंत पाटील*
शहादा(प्रतिनिधी):-कुटुंबात एक ज्येष्ठ नागरिक असणे गरजेचे आहे. मग ते महिला असो वा पुरुष. ते कुटुंबातील सर्व सदस्यांना सुयोग्य मार्ग दाखवून त्यांच्यावर चांगले संस्कार घडवितात. माझ्यावर सुद्धा ज्येष्ठांचे संस्कार झाले आहेत. म्हणून मी या पदावर तुमच्यासमोर उभा आहे, असे उद्गार शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी काढले. शहादा येथील ज्येष्ठ नागरिक भवनात जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागरूकता दिनानिमित्ताने वक्ते म्हणून बोलताना पुढे म्हणाले, मी तुमच्या सेवा व सहकार्यासाठी सदैव तत्पर आहे. कोणतीही अडचण आल्यास मला अहो रात्र केव्हाही फोन करा, असे शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकमान्य ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष रामजी पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून शहादा तहसीलदार संभाजी पाटील, शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, डॉ.  श्रीमती सिमरन पाटील उपस्थित होते. प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फेस्काम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण भट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. नंतर साने गुरुजी लिखित खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सामुदायिक रित्या म्हटली. नंतर लोणखेडा ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष गुलाबराव पवार, भारतीय हवाई दलात विमान अपघातात शहीद झालेले पाच जवान व इतर दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे शाल व बुके देऊ सत्कार करण्यात आला. वसंत पाटील, झेलसिंग पावरा, के.डी. गिरासे, सुनंदा नागेश, भगवान पाटील, बापूराव कोळी, राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना नॅपकिन व गुलाब पुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहादा तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. जे.डी. पटेल प्रास्ताविक भाषणात म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांवर परिवारात व समाजात वेगवेगळ्या पद्धतीने छळ होत असतो. त्याविषयी जागृतता निर्माण करण्यासाठी 2011 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. प्रमुख वक्ते शहादा तहसीलदार संभाजी पाटील आपल्या भाषणात म्हणाले, जीवनात हसत रहा, एकमेकांशी संवाद साधा. तुमच्या मदतीसाठी सरकार आपल्या पाठीशी आहे. तुमच्यासाठी सरकारने  2007 च्या कायद्यानुसार भरपूर संरक्षण दिले आहे. आपल्या नावावरील मालमत्ता व बँक खात्यावरील रक्कम इतरांच्या नावे शेवटपर्यंत करू नका, परावलंबी राहू नका स्वावलंबी राहा. असे शेवटी सांगितले. संत नरहरी जेष्ठ नागरिक मंडळातर्फे के.डी. गिरासे, डी.जी पाटील, आनंदराव विसपुते यांनी प्रमुख पाहुण्यांना  आधारवड नावाच्या पुस्तकाच्या प्रती दिल्या.कार्यक्रमास डॉ. शशांक कुलकर्णी, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. सुरेश पाटील, नगिन पाटील, कांतीलाल पाटील, विनोद पाटील, क्षीरसागर, वसंत पाटील, लिलाबाई पाटील, महिला संघाच्या उपाध्यक्ष सुशीला पाटील व ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांच्या आहार व आरोग्य या विषयावर बोलताना नाशिक येथील डॉ. सिमरन पाटील म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आहारात दूध व दुधापासून तयार झालेले पदार्थ, राजमा, अक्रोड, फायबर, सफरचंद,डाळी, शेंगदाणे, मेथी हे अन्नपदार्थ नियमित घ्यावे व हंगामी फळे खावीत रोज दहा ते बारा ग्लास पाणी प्यावे. चांगल्या आरोग्यासाठी रोज 30 मिनिटे चालणे. मित्रांसोबत हसा व गमतीजमती करा, असे शेवटी म्हणाल्या. भरत पाटील यांनी योगासनांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात रामजी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. पावरा बारेला समाजाचे उपाध्यक्ष झेलसिंग पावरा यांनी अल्पोहार दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रघुनाथ बेलदार, शिकलकर, जगन्नाथ पाटील, सुदाम पाटील व सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डी. जी. पाटील यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शेतीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी निगदी धडगाव “खेत बचाओ अभियान”ची जनजागृती*
June, 16 2026
*श्रॉफ हायस्कूलमध्ये 'मिशन फॉर लाईफ' अंतर्गत पर्यावरण संवर्धन पंधरवड्याचा प्रारंभ*
June, 16 2026
*उमरी शहरात मटका व्यवसाय बोकाळला,पोलीस यंत्रणेचे मौन?*
June, 16 2026
*ज्येष्ठ नागरिकांमुळे कुटुंबावर चांगले संस्कार घडतात- पो.नि.हेमंत पाटील*
June, 16 2026
*नंदुरबार येथे चित्रकथी-हरदास समाजाच्या जात वैधता प्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
June, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज