*नंदुरबार जिल्हा परिषदेत 45 केंद्रप्रमुख लवकरच होणार रुजू; शिक्षण क्षेत्राला मिळणार गती!शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या पुढाकाराने वर्षानुवर्षे रखडलेली पदभरती अखेर पूर्णत्वास; जिल्ह्य
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा परिषदेत 45 केंद्रप्रमुख लवकरच होणार रुजू; शिक्षण क्षेत्राला मिळणार गती!शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या पुढाकाराने वर्षानुवर्षे रखडलेली पदभरती अखेर पूर्णत्वास; जिल्ह्य
*नंदुरबार जिल्हा परिषदेत 45 केंद्रप्रमुख लवकरच होणार रुजू; शिक्षण क्षेत्राला मिळणार गती!शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या पुढाकाराने वर्षानुवर्षे रखडलेली पदभरती अखेर पूर्णत्वास; जिल्ह्यातील शिक्षण वर्गात आनंदाचे वातावरण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या केंद्रप्रमुखांच्या पदांवर अखेर लवकरच नवीन अधिकारी रुजू होणार आहेत. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या खंबीर पुढाकारामुळे आणि विशेष प्रयत्नांमुळे वर्षानुवर्षे रखडलेली ही केंद्रप्रमुख पदभरती आता अंतिम टप्प्यात आली असून, नंदुरबार जिल्ह्यातील गुणवत्ता यादीतील 45 उमेदवारांना लवकरच प्रत्यक्ष नियुक्ती दिली जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ही पदभरती विविध कारणांमुळे प्रलंबित होती. परिणामी, जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर प्रभारी राज सुरू होते आणि एकाच केंद्रप्रमुखावर अनेक केंद्रांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. दुर्गम व डोंगराळ भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यामुळे शाळांचे नियमित पर्यवेक्षण, शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि प्रशासकीय कामांवर मोठा ताण पडत होता. मात्र, शासन स्तरावर शिक्षणमंत्री महोदयांनी घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आणि आता थेट गुणवत्ताधारक शिक्षकच केंद्रप्रमुख म्हणून शिक्षण प्रशासनात येत आहेत.
नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील अनेक अभ्यासू व अनुभवी शिक्षकांनी उत्तम यश संपादन केले आहे. या 45 नवनियुक्त केंद्रप्रमुखांच्या रुजू होण्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळांचे मूल्यांकन सुधारण्यास, शिक्षकांना जागेवरच योग्य मार्गदर्शन मिळण्यास आणि केंद्र स्तरावरील शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मोठी मदत होणार आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि पुढील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांतच त्यांना प्रत्यक्ष नियुक्तीचे आदेश दिले जातील. शिक्षणमंत्र्यांच्या या संवेदनशील निर्णयामुळे वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न सुटल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक संघटना, शिक्षणप्रेमी आणि पालकांमधून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांचे विशेष आभार मानले जात आहेत.



