*मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानचा 18 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानचा 18 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा*
*मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानचा 18 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा*
चुनाकोळवण(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठानचा 18 वा वर्धापन दिन 15 मे 2026 रोजी "चुनाकोळवण महोत्सव" मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी थाटामाटात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन राजापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमित यादव यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाच्या ध्वजवंदनाने करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतीक मटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या महोत्सवात 'एक धाव एकीसाठी' असा संदेश देणाऱ्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विविध तीन गटांमध्ये करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 72 स्पर्धकांनी भाग घेतला.या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय मुलांच्या खुल्या गटांमध्ये प्रथम क्रमांक कुमार महेंद्र दत्तराम कुडकर (शिरवली) द्वितीय क्रमांक कुमार निलेश नंदकिशोर कुळये (वेरवली) व तृतीय क्रमांक अथर्व मिलिंद माजळकर (झापडे) लांजा तसेच मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक स्वरा संजय उपशेट्ये (लांजा) द्वितीय क्रमांक कुमार प्राप्ती अनंत तरळ (कळसवली) व तृतीय क्रमांक स्वरा रवींद्र गाडे (चुनाकोळवण) या स्पर्धकांनी जिंकण्याचा मान मिळवला. महिलांच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम, उत्सव स्त्रीशक्तीचा खेळ पैठणीचा यात महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्या स्पर्धांमध्ये आठ गावातील जवळपास 450 महिलांनी सहभाग घेतला, तसेच या कार्यक्रमात 11 पैठण्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला वेगवेगळ्या गावातील काढण्यात आलेल्या महिलांच्या लकी ड्रॉमध्ये दीपांजली दशरथ मटकर कुमारी प्रज्ञा प्रकाश बाईत सौ साधना संदीप मटकर अशा अकरा महिलांना पैठणीचे वाटप करण्यात आले. नाविन्यपूर्ण झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते मंदार शिंदे यांनी आकर्षक व प्रभावीपणे केले.
महिलांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये 15 महिलांना आकर्षक आकर्षक बक्षीसे देण्यात आली, त्याचबरोबर पुरुषांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. सन 2025 च्या गणपती सजावट स्पर्धेच्या विजेत्यांनाही बक्षीस देण्यात आली, त्यामध्ये प्रथम क्रमांक शिवराम सोयने द्वितीय क्रमांक प्रकाश मांडवकर तृतीय क्रमांक केशव मटकर यांनी पटकावला होता. गावातील मुला मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कुमारी अपर्णा तानाजी मटकर अमिषा तानाजी मटकर कुमारी इशिका संदीप मटकर कुमारी साक्षी प्रमोद मटकर अशा 16 मुलांनी आपली कला सादरीकरण केले त्याचबरोबर कुमार राजकृष्ण उदय सावंत यांनी अभंगाचे गायन केले. विविधतेने नटलेल्या चुनाकोळवण महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किरण सामंत उपस्थित होते त्यांच्या हस्ते विजेत्यां स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली. त्याचबरोबर संघटनेच्या गीताचे सादरीकरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यांनी आपल्या भाषणामध्ये प्रतिष्ठानने चालवलेल्या विविध उपक्रमाची प्रशंसा केली व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
विशेषत सवतकडा याच्या पर्यटन विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.
चुनाकोळवण महोत्सवाला ओबीसी समाजाचे नेते चंद्रकांत बावकर, आरडीसी बँकेचे संचालक महेश खामकर, विभागातील प्रगताशील शेतकरी दयानंद चौगुले यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता वाघदेवी नमन नाट्य मंडळ निवळी सावर्डे यांच्या सुंदर नमन नाट्यच्या सादरीकरणाने करण्यात आली.
या महोत्सवाला जवळपास 700 ते 800 लोकांनी भेट दिली.



