*चर्मकार विकास महामंडळातर्फे कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चर्मकार विकास महामंडळातर्फे कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
*चर्मकार विकास महामंडळातर्फे कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या नंदुरबार जिल्हा कार्यालयामार्फत आर्थिक वर्ष 2026-27 साठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर इ.) आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींचे जीवनमान उंचावणे हा यामागचा मुख्य उद्देश असून या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यु.जे. देवकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. योजनांचा तपशील: 50 टक्के अनुदान योजना: 20 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट.
बीज भांडवल योजना: 12 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट.
महत्त्वाच्या अटी व शर्ती: मध्यस्थांना मज्जाव: अर्जदाराने स्वतः जिल्हा कार्यालयात हजर राहून अर्ज सादर करणे अनिवार्य आहे; मध्यस्थामार्फत आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. जुने प्रस्ताव रद्द: यापूर्वीचे सर्व जुने कर्ज प्रस्ताव रद्द करण्यात आले असून नवीन अर्ज करणे आवश्यक आहे. पात्रता: अर्जदार कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा आणि कुटुंबात कोणीही यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. कागदपत्रे: अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, कोटेशन आणि आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल तसेच वाहनासाठी लायसन्स/परवाना/बॅच बिल्ला, जागेचा पुरावा लाईटबिल/टॅक्सपावती, शहरी असल्यास उद्योग आधार अथवा शॉप ॲक्ट ग्रामीण असल्यास नाहरकत दाखला, बीज भांडवल योजनेसाठी एक सक्षम जामीनदार (शेतकरी अथवा शासकीय नोकरदार) आवश्यक. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा व्यवस्थापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा व्यवस्थापक देवकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



