*जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक*
*जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदूरबार जिल्ह्यातील निंबोणी ता. नवापूर येथे खेत बचाव अभियान, यात डॉ. हेडगेवार सेवा समिती,कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार, कृषी विभाग, नंदुरबार व आत्मा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यामाने गाव निंबोणी तालुका नवापूर येथे खेत बचाव अभियान, अंतर्गत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथील कृषिविद्या, शास्त्रज्ञ उमेशपाटील, पशुसंवर्धन, शास्त्रज्ञ डॉ. खुशाल राठोड, मृदा तज्ञ् प्रवीण चव्हाण आदी उपस्थित होते. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे अग्रोनॉमी उमेश पाटील यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून पिकासाठी शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत, जैविक खत निर्मिती व करून तसेच खरीप हंगामासाठी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून घरच्या घरी कृषी निविष्ठा बनविल्यास उत्पादन खर्च कमी करू शकतो व मतीचे आरोग्य टिकवण्यासाठी फायदा दिसून येतो याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ पशुसंवर्धन डॉ खुशाल राठोड यांनी गायीचे महत्व आणि पशु हे आपल्यासाठी तसेच कृषी साठी किती महत्त्वाचे आहे आणि त्याचा शेतामध्ये कसा फायदा होईल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे प्रवीण चव्हाण यांनी माती परीक्षण कसे करावे माती परीक्षणाचे काय फायदे आहेत त्यांच्यामध्ये कशाची कमतरता असल्यावर कोणते खत टाकावेत आणि आपण कोणत्या हंगामामध्ये माती परीक्षण करावे सर्व पिकांसाठी बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.
निंबोणी गावातील प्रगतशील शेतकरी श्रीकृष्ण कोकणी यांनी आवाहन करून कमी खर्चात सेंद्रिय निविष्ठा कशा तयार करता येतील व आपले अनुभव कथन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण प्रवीण चव्हाण कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील कृष्णा कोकणी, देविदास कोकणी आदींनी परिश्रम घेतले. खेत बचाव अभियान कार्यक्रमासाठी गावातील पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



