*मृदा आरोग्य संवर्धनासाठी शेतकऱ्यांनी जैविक उपायांचा अवलंब करावा", दुधखेडा, चांदसैली येथे खेत बचाव अभियान कार्यक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मृदा आरोग्य संवर्धनासाठी शेतकऱ्यांनी जैविक उपायांचा अवलंब करावा", दुधखेडा, चांदसैली येथे खेत बचाव अभियान कार्यक्रम*
*मृदा आरोग्य संवर्धनासाठी शेतकऱ्यांनी जैविक उपायांचा अवलंब करावा", दुधखेडा, चांदसैली येथे खेत बचाव अभियान कार्यक्रम*
नंदूरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार, कृषी विभाग नंदुरबार व आत्मा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने "खेत बचाव अभियान" अंतर्गत शेतकरी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास के एस वसावे, उपविभागीय कृषी अधिकारी कृषी विभाग, पद्माकर कुंदे, पीक संरक्षण तज्ञ, डॉ. वैभव गुर्वे, उद्यानविद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार, सतीश यादव, सदगुरू फाउंडेशन, तसेच मनोज खैरनार, उप कृषी अधिकारी, कृषी विभाग नंदुरबार, भावर सिंग, कृषि व्यवस्थापक, सदगुरू फाउंडेशन, सौ. पूनम पवार, ब्रिटानिया फाउंडेशन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात संदीप कुवर YPI, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी प्रास्ताविकात खेत बचाव अभियाना संदर्भात माहिती देऊन यामागील भूमिका विषद केली. तांत्रिक मार्गदर्शनात पद्माकर कुंदे यांनी "खेत बचाव अभियान" अंतर्गत माती व पाण्याचे संवर्धन, सेंद्रिय कर्ब वाढविणे आणि रासायनिक निविष्ठांचा संतुलित पण कमीत कमी कसा वापर करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी घरच्या घरी सेंद्रिय निविष्ठा तयार करून त्याचा वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. वैभव गुर्वे यांनी फळबाग व भाजीपाला पिकांमध्ये सेंद्रिय उत्पादन तंत्रज्ञान, दर्जेदार उत्पादन करिता जैविक खत व फवारणी व्यवस्थापन याची माहिती देऊन फळबाग करिता ठिबक सिंचनाचा वापर करून पाण्याचा सुयोग्य व्यवस्थापन करावे आवाहन केले.
सतीश यादव सदगुरू फाउंडेशन द्वारे सुरू असलेले उपक्रम, जैविक शेती, गांडुळखत फळबाग, भाजीपाला लागवड, शेततळे, ठिबक सिंचन, पाणी पुनर्भरण आदी विषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात के. एस. वसावे यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, फळबाग लागवड योजना, ठिबक सिंचन योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) तसेच पीएमएफएमई योजनेविषयी माहिती दिली. त्यांनी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची पद्धत व लाभार्थी निवड प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बच्छाव, आत्मा, नंदुरबार यांनी केले. कार्यक्रमासाठी परिसरातील पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



