*भारत सरकारच्या खेळ क्रिडा मंत्रालयातर्फे विनोद चाळके विशेष पुरस्काराने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारत सरकारच्या खेळ क्रिडा मंत्रालयातर्फे विनोद चाळके विशेष पुरस्काराने सन्मानित*
*भारत सरकारच्या खेळ क्रिडा मंत्रालयातर्फे विनोद चाळके विशेष पुरस्काराने सन्मानित*
मुबंई(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या खेळ क्रीडा मंत्रालयातर्फे (NYK) घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात सहभाग घेऊन युवाना केलेला विशेष योगदानाबद्दल खेळ क्रीडा मंत्रालयाच्या अधिकारी (पी. आर.ओ.) सौ. स्वेता काकडे तसेच अधिकारी विशाल काकडे तसेच समाजसेवक डॉ. नेमीचंद छाजेड यांच्या शुभ हस्ते सांताक्रूझ येथे झालेल्या भव्य सोहळ्यात विनोद सदानंद चाळके यांना भारत सरकारच्या खेळ क्रीडा मंत्रालयातर्फे विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले त्यांना मिळालेल्या या सन्मानामुळे समाजातून शुभेच्छांच वर्षाव होत आहे, या अगोदर त्यांनी क्रीडा व शिक्षण क्षेत्रात विषेश प्रावीन्य मिळविलेल्या युवाना दरवर्षी बालगौरव व युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. युवांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून युवाना मोलाचं योगदान दिलं आहे त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन, शिक्षण, साहित्य,नाट्य आणि फिल्म क्षेत्रातही त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून युवा पिढीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत त्यांच्या कार्याची दखल जागतिक महान विक्रमाने घेतलेली आहे ज्यांच्या माध्यमातून युवा पिढी सक्षम व जिद्दीने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित होईल व समाजाला राज्याला तसेच देशाला त्यांच्या योगदानाचं लाभ होईल त्यांना मिळालेल्या विशेष सन्मानामुळे समाजातील अनेक थरातून कौतुक होत आहे. त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
श्री विनोद चाळके आपली सामाजिक सेवेचा रथ गेली 21 वर्षांपासून पुढे घेऊन जाण्याचं प्रयत्न करत आहे. समाजानेही अशा व्यक्तींना योगदान द्यायला हवे. व त्यांनी चालविलेल्या सामाजिक चळवळ पुढे नेण्यासाठी मोलाचा हातभार लावणे गरजेचे आहे. तरच त्यांच्या या कार्याला आणखी पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळेल.



