*जिल्हाधिकारी कार्यालयात 15 जून रोजी ‘महिला लोकशाही दिन’,पीडित महिलांना थेट किंवा ऑनलाईन माध्यमातून तक्रार मांडण्याची सुवर्णसंधी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हाधिकारी कार्यालयात 15 जून रोजी ‘महिला लोकशाही दिन’,पीडित महिलांना थेट किंवा ऑनलाईन माध्यमातून तक्रार मांडण्याची सुवर्णसंधी*
*जिल्हाधिकारी कार्यालयात 15 जून रोजी ‘महिला लोकशाही दिन’,पीडित महिलांना थेट किंवा ऑनलाईन माध्यमातून तक्रार मांडण्याची सुवर्णसंधी*
नंदुरबार(प्रतिनिधी):- नंदुरबार जिल्ह्यातील समस्याग्रस्त आणि पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना तातडीने न्याय मिळावा यासाठी शासन निर्णयानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर 'महिला लोकशाही दिन' आयोजित केला जातो. त्यानुसार, चालू जून महिन्यात सोमवार 15 जून 2026 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृह येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
समाजातील पीडित महिलांच्या तक्रारी आणि अडचणी शासकीय यंत्रणेकडून तातडीने सोडवल्या जाव्यात आणि त्यांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अशी नोंदवा आपली तक्रार: प्रत्यक्ष उपस्थिती: तक्रारदार महिलांनी आपले तक्रार अर्ज घेऊन 15 जून रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे स्वतः उपस्थित राहावे. ऑनलाईन माध्यम: ज्या महिलांना प्रत्यक्ष येणे शक्य नाही, त्यांनी https://meet.google.com/pnz-pxru-pbd या गुगल मीट लिंकच्या माध्यमातून दुपारी 1 ते 2 या वेळेत ऑनलाईन उपस्थित राहून आपली तक्रार मांडावी. महिला लोकशाही दिनामध्ये मांडण्यात येणारी तक्रार ही केवळ वैयक्तिक स्वरूपाची असावी. न्यायालयीन प्रविष्ट (न्यायप्रविष्ठ), आस्थापना विषयक किंवा सामूहिक स्वरूपाच्या तक्रारी या ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीत, याची सर्व तक्रारदार महिलांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



