*नंदुरबार सायबर पोलीस स्टेशनची कारवाई सायबर फसवणुकीसाठी बँक खाती (म्युल अकाउंट) उपलब्ध करून देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार सायबर पोलीस स्टेशनची कारवाई सायबर फसवणुकीसाठी बँक खाती (म्युल अकाउंट) उपलब्ध करून देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक*
*नंदुरबार सायबर पोलीस स्टेशनची कारवाई सायबर फसवणुकीसाठी बँक खाती (म्युल अकाउंट) उपलब्ध करून देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक*
नंदूरबार(प्रतिनिधी):-9 जून 2026 रोजी गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक अमोल वा. सातोदकर, नेमणूक सायबर पोलीस ठाणे, नंदुरबार व पोहेका /1110 भटु धनगर, पोकॉ/1287 राहुल तडवी, पोकों/569 किरण जिरेमाळी असे बँक ऑफ महाराष्ट्राचे बाहेरील बाजूस जवळपास गेलो असता, तेथे दोन इसम हे एका सफेद रंगाचा मेस्ट्रो गाडीवर सशंयितरित्या बसलेले दिसल्याने पोलीस पथक त्यांचेवर पाळत ठेवुन होतो, थोड्या वेळाने दोन इसम तेथे येवुन त्यांना भेटुन त्यांच्या ताब्यातील पासबुक सदृश्य कागदपत्र देत असतांना त्यांना पकडले व सदर बाबत विचारणा केली असता त्यांनी उडावा- उडवीचे उत्तरे दिल्याने त्यांना पोलीस पथकाने विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांतील सागर कमु ठाकरे व अहमद शहा यांनी सांगितले की, आम्हाला रेहान व शाकीर यांनी सांगीतले होते की, आम्हांला बँक खाते उघडुन द्या आम्ही तुम्हांला पैसे देऊ असे सांगितले होते त्यानुसार आम्ही त्यांना आमचे बँक ऑफ महाराष्ट्राचे खाते उघड्डुन दिले. सदर आरोपीतांकडुन 4 बँक पासबुक व दोन गुलाबी रंगाचे किट बुक (ATM) तसेच हिरो कंपनीचे मेस्ट्रो स्कुटी आणि HF Delux असे दोन दुचाकी वाहनांसह वेगवेगळ्या कंपनीचे 5 मोबाईल व एक लोखंडी फाईटर, इंडियन पोस्ट पेमेंट कार्ड असे एकुण 15 आर्टिकल जप्त करण्यात आले असुन त्यांची एकुण किंमत 40 हजार 050 रुपये एवढी आहे. सदरचे बँक खाते हे सायबर फ्रॉड मध्ये पैसे स्विकारण्यासाठी हस्तांतरीत करणार आहेत बाबत निष्पन्न झाल्याने सायबर पोलीस स्टेशन, नंदुरबार येथे नेमणुकीस असलेले पोकॉ/1213 पवन अभिलाल पाटील यांच्या फिर्यादीवरुन रेहान इस्माईल बागवान, शाकीर शकुर खाटीक, अहमद शहा चांद शहा, सागर कमु ठाकरे, कौसैन फारुख मेमन सर्व रा. नंदुरबार अशांविरुध्द गुन्हा दाखल करुन आरोर्पीना अटक करुन न्यायालया समोर हजर केले असता त्यांना 14 जून 2026 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. सदरची कामगीरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती. अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अमोल वा. सातोदकर, सायबर पोलीस स्टेशन, नंदुरबार पोहेका /1110 भटू धनगर, पोकॉ/1287 राहुल तडवी, पोकॉ/569 किरण जिरेमाळी, पोकॉ/1213 पवनं पाटील, पोकॉ/781 सुभाष वळवी, पोना/1206 योगेश मोरे यांनी केली आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती. अश्विनी सानप यांनी नंदुरबार
जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की,
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आमिषाला बळी पडू नये. बँक खाते उघडून देणे, खाते भाड्याने देणे किंवा खात्याची कागदपत्रे इतरांच्या ताब्यात देणे टाळावे. अशा प्रकारे ज्यांनी कोणी आपले बँक खाते किंवा संबंधित कागदपत्रे इतरांच्या वापरासाठी दिली असल्यास तात्काळ नंदुरबार सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच तक्रार 1930 किंवा WWW.cybercrime.gov.in यावर दयावी. तरी नागरिकांनी सावध राहावे.



