*चिंचपाडा खोकरविहीर येथे जलथॉन-2026 जलसंवर्धन उपक्रम उत्साहात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चिंचपाडा खोकरविहीर येथे जलथॉन-2026 जलसंवर्धन उपक्रम उत्साहात*
*चिंचपाडा खोकरविहीर येथे जलथॉन-2026 जलसंवर्धन उपक्रम उत्साहात*
सुरगाणा(प्रतिनिधी):-खोकरविहीर पैकी चिंचपाडा येथे जलथॉन- 2026 या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एक धाव पाण्यासाठी या थीमवर
उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन आणि निसर्गसंरक्षण या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमाच्या माध्यमातून 11 गावांच्या सर्वांगीण जलव्यवस्थापन आराखड्याला दिशा देण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन जलपरिषद मित्र परिवार, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (वीजेटीआय), मुंबई, ऋणमुक्त सेवाभावी फाऊंडेशन , नाशिक आणि आयडियाझम सामाजिक संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
गाव नकाशे उद्घाटन व जलमित्र प्रशिक्षण
उद्घाटनप्रसंगी प्रा. इंजि. प्रविण चौधरी (वीजेटीआय, मुंबई) यांच्या हस्ते 12 गावांच्या जलमित्र स्वयंसेवकांसाठी तयार करण्यात आलेल्या जलस्रोत नकाशांचे उद्घाटन करुन वाटप केले.
पाणी व निसर्ग संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करताना महाराष्ट्रातील दुष्काळी तसेच अतिवृष्टीग्रस्त भागांचे उदाहरण देऊन जलसंधारणाची गरज अधोरेखित केली. प्रमुख पाहुण्या म्हणून रुपल गुजराथी (ऋणमुक्त सेवाभावी फाऊंडेशन, नाशिक), तसेच विविध सामाजिक संस्था प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी गावे व ग्रामविकासाचा संकल्प
चिंचपाडा, भेनशेत, चिऱ्याचापाडा, आमदा (बाहे), कळमणे, खिर्डी, केळावण, बेडसे, गुरटेंबी, भाटी आणि ठाणगाव या गावांचा या उपक्रमात समावेश आहे. या सर्व गावांच्या जलस्रोत व्यवस्थापनासाठी एकत्रित आराखडा तयार करण्याचा संकल्प करण्यात आला. जलमित्र जलदूत यांचे सामाजिक योगदान या उपक्रमात स्थानिक जलमित्र स्वयंसेवकांची निवड करण्यात आली असून टी- शर्ट वाटप व प्रशिक्षणाद्वारे त्यांना जबाबदारी देण्यात आली. यामध्ये जलदूत म्हणून दिपक गुप्ते, विजय कांबळे, विवेक जक्कानी, तसेच सौ.श्वेता झुनझुनवाला, सौ. निशिगंधा कुऱ्हाडे, प्रसाद बोडस, अशोक कलबाग, योगेश कर्णिक, धनंजय महाजन यांचे विशेष योगदान राहिले.
टी-शर्ट उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण पुढाकार ग्रुप, वीजेटीआय व आयआयटी संबंधित सहयोगी समूहांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यावेळी देविदास गावित, पांडुरंग गावित, योगेश महाले, संजय पडेर, देविदास पाडवी, शांताराम जाधव, दुर्वादास गायकवाड, राज्य पुरस्कार विजेते शिक्षक रतन चौधरी, तुळशीदास चव्हाण, शिवराम वळवी, नामदेव पाडवी, शांताराम महाले, जयप्रकाश महाले, संतोष खुरकुटे, हंसराज भोये, संकेत देनक, शुधांशु धारणे, रुपल गुजराथी, नारायण गभाले, प्रविण चौधरी, देविदास कामडी व भाटी, खिर्डी, भेनशेत, बेडसे, आमदा बाऱ्हे, ठाणगाव, गुरटेंबी, कळमणे केळावण, चिऱ्याचापाडा, चिंचपाडा या 11 गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. जलथॉन- 2026 हा उपक्रम ग्रामीण भागातील जलसाक्षरता, निसर्गसंवर्धन आणि शाश्वत विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, गाव पातळीवर वैज्ञानिक पद्धतीने जलव्यवस्थापन आराखडे तयार करण्याची नवी दिशा या उपक्रमातून मिळत आहे.



