*खांडबारा येथे क्षयरोग निर्मूलनासाठी मोठा उपक्रम; 62 नागरिकांची एक्स-रे तपासणी, 25 टीबी रुग्ण दत्तक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खांडबारा येथे क्षयरोग निर्मूलनासाठी मोठा उपक्रम; 62 नागरिकांची एक्स-रे तपासणी, 25 टीबी रुग्ण दत्तक*
*खांडबारा येथे क्षयरोग निर्मूलनासाठी मोठा उपक्रम; 62 नागरिकांची एक्स-रे तपासणी, 25 टीबी रुग्ण दत्तक*
नवापूर(प्रतिनिधी):-राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत ग्रामपंचायत सभागृह, खांडबारा येथे पोषण आहार वाटप व मोफत छातीच्या एक्स-रे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 62 नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमास धनंजय गावित, प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच दिपाली गावित, माजी सरपंच अविनाश गावित, राजेंद्र अग्रवाल,पदमाकर शिंदे, संदीप नाईक, शरीफ बागवान, मनीष चौधरी, अभिजित रामराजे, झुबेर शेख, मयूर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाअंतर्गत क्षयरोगग्रस्त रुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. तसेच समाजातील विविध मान्यवरांनी मिळून 25 टीबी रुग्ण दत्तक घेण्याचा संकल्प केला. यामध्ये धनंजय गावित यांनी 5, रंजना अविनाश गावित यांनी 5, राजेंद्र अग्रवाल यांनी 5, जगन यांनी 5 आणि दिपाली गावित यांनी 5 रुग्ण दत्तक घेतले.
खांडबारा परिसरातील एकूण 119 टीबी रुग्णांच्या उपचार व आरोग्यविषयक नोंदींचा आढावा यावेळी घेण्यात आला. क्षयरोगाचे वेळेत निदान, नियमित उपचार आणि पौष्टिक आहार यामुळे टीबीमुक्त समाज निर्माण होऊ शकतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार, आरोग्य विभाग नवापूर व ग्रामपंचायत खांडबारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. "सशक्त भारत, टीबी मुक्त भारत" या संकल्पनेला बळ देत खांडबारा येथे राबविण्यात आलेला हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यदायी व प्रेरणादायी ठरला.



