ताजा खबरे:
*‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई
*संत दगा महाराज प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू, गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन*
*चिंचपाडा खोकरविहीर येथे जलथॉन-2026 जलसंवर्धन उपक्रम उत्साहात*
*खांडबारा येथे क्षयरोग निर्मूलनासाठी मोठा उपक्रम; 62 नागरिकांची एक्स-रे तपासणी, 25 टीबी रुग्ण दत्तक*
*आदिवासी युवा सेना संघटनेकडून सोना गॅस एजन्सीविरोधात तहसीलदार,शहादा यांना निवेदन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आदिवासी युवा सेना संघटनेकडून सोना गॅस एजन्सीविरोधात तहसीलदार,शहादा यांना निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आदिवासी युवा सेना संघटनेकडून सोना गॅस एजन्सीविरोधात तहसीलदार,शहादा यांना निवेदन*

  • Share:

*आदिवासी युवा सेना संघटनेकडून सोना गॅस एजन्सीविरोधात तहसीलदार,शहादा यांना निवेदन*
‎‎शहादा(प्रतिनिधी):-तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आदिवासी युवा सेना संघटनेच्या वतीने तहसीलदार, शहादा यांना निवेदन देण्यात आले. ‎भारतीय संविधानातील अनुच्छेद 19, 21 व 38 चा उल्लेख करत संघटनेने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ही तक्रार केली आहे. निवेदनानुसार, मंडाणा परिसरातील वागर्डे, तितरी, जाम, जावदे त.ह. तसेच इतर गावांतील अनेक नागरिकांनी घरगुती गॅस सिलिंडरचे बुकिंग करूनही 15 ते 20 दिवस उलटल्यानंतरही गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून काही कुटुंबांवर पुन्हा चुली पेटवण्याची वेळ आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ‎निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासनाच्या नियमांनुसार घरगुती वापरासाठी असलेले LPG गॅस सिलिंडर आणि हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट यांच्यासाठी वापरण्यात येणारे व्यावसायिक (Commercial) LPG गॅस सिलिंडर वेगवेगळे असतात. त्यामुळे घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणे नियमबाह्य मानले जाते. ‎तसेच, काही हॉटेल व ढाबा चालकांना 1500 ते 2000 रुपये दराने घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. ‎एकीकडे सर्वसामान्य ग्राहकांना अनेक दिवस प्रतीक्षा करूनही गॅस सिलिंडर मिळत नसताना दुसरीकडे व्यावसायिकांना प्राधान्य दिले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच गॅस वितरण व्यवस्थेत पारदर्शकता ठेवून ग्रामीण व दुर्गम भागातील सर्व पात्र ग्राहकांना नियमानुसार व वेळेत घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ‎याशिवाय, गावांमधील नागरिकांना तातडीने व नियमित घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा सुरू करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. ‎या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व एजन्सी व्यवस्थापनावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी युवा सेना संघटनेने केली आहे. ‎येत्या 15 दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास व संबंधित तक्रारींची दखल न घेतल्यास आदिवासी युवा सेना संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. ‎दरम्यान, या निवेदनाच्या प्रती उपविभागीय दंडाधिकारी, शहादा, जिल्हाधिकारी, नंदुरबार आणि सोना गॅस एजन्सीचे व्यवस्थापक यांना देखील पाठविण्यात आल्या असून संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.‎ ‎दिलीप एस. महिरे तालुका अध्यक्ष, ‎सुनिल पवार सोशल मीडिया प्रमुख,
‎दिलीप मुसळदे कार्यकर्ता,
‎राजेश ठाकरे  कार्यकर्ता,
‎रोहित पवार  कार्यकर्ता,
‎भागीरथ ठाकरे कार्यकर्ता,
‎दगडू निकुंम कार्यकर्ता ‎तसेच आदिवासी युवा सेना संघटनेचे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई
June, 10 2026
*संत दगा महाराज प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू, गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन*
June, 10 2026
*चिंचपाडा खोकरविहीर येथे जलथॉन-2026 जलसंवर्धन उपक्रम उत्साहात*
June, 10 2026
*खांडबारा येथे क्षयरोग निर्मूलनासाठी मोठा उपक्रम; 62 नागरिकांची एक्स-रे तपासणी, 25 टीबी रुग्ण दत्तक*
June, 10 2026
*आदिवासी युवा सेना संघटनेकडून सोना गॅस एजन्सीविरोधात तहसीलदार,शहादा यांना निवेदन*
June, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज