*जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक*
*जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदूरबार जिल्ह्यातील काकरदा ता.नंदुरबार येथे खेत बचाव अभियान, डॉ. हेडगेवार सेवा समिती,कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार, कृषी विभाग, नंदुरबार व आत्मा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यामाने काकरदा ता. नंदुरबार येथे खेत बचाव अभियान, अंतर्गत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी दीपक पटेल प्रकल्प संचालक, आत्मा, नंदुरबार जयंत उत्तरवार, पद्माकर कुंदे, डॉ. वैभव गुर्वे, विषय तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार करणसिंग गिरासे, उप कृषी अधिकारी, कृषी विभाग नंदुरबार आदी उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ञ पद्माकर कुंदे यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून पिकासाठी शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत, जैविक खत निर्मिती व वापर याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ वैभव गुर्वे, उद्यानविद्या तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व फळबाग लागवड व महत्त्व याविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. जयंत उत्तरवार, कृषी अभियंता कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी कमी पाण्यात पिकाचे नियोजन कशा पद्धतीने करावे व मूलस्थानी जल व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. करणसिंग गिरासे, उप कृषी अधिकारी, कृषी विभाग नंदुरबार यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व सर्व पिकांसाठी बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले.
- आपल्या समारोपीय मार्गदर्शनात दीपक पटेल, प्रकल्प संचालक, आत्मा यांनी नैसर्गिक शेती अभियानात शेतकऱ्यांनी सहभाग वाढविण्याचे आवाहन करून कमी खर्चात सेंद्रिय निविष्ठा कशा तयार करता येतील याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप कुवर YPl, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील देविदास माळी, धनराज माळी, प्रभाकर माळी, राजाराम माळी आदींनी परिश्रम घेतले. खेत बचाव अभियान कार्यक्रमासाठी गावातील पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



