*शताब्दी फार्मसी, नंदुरबार चे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांचा माजी FDA आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी फार्मसी, नंदुरबार चे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांचा माजी FDA आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि सत्कार*
*शताब्दी फार्मसी, नंदुरबारचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांचा माजी FDA आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि सत्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोशिएशन (NPWA) संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी 'शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी'चे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे माजी कमिशनर महेश झगडे यांच्या हस्ते डॉ. पंकज चौधरी यांचा विशेष सत्कार पूणे येथे NPWA चा दुसरा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात करण्यात आला. डॉ. पंकज चौधरी हे फार्मसी (औषधनिर्माण शास्त्र) क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. त्यांच्या या अनुभवाचा फायदा जिल्ह्यात संघटनेचे जाळे विस्तारण्यासाठी आणि संबंधित क्षेत्रातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. महेश झगडे यांच्यासारख्या प्रशासकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते सत्कार झाल्याने डॉ. चौधरी यांच्यावर शैक्षणिक आणि सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. "माजी आयुक्त महेश झगडे सरांच्या हस्ते मिळालेला हा सत्कार माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. 'NPWA' संघटनेने माझ्यावर सोपवलेली नंदुरबार जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेल. जिल्ह्यातील व्यावसायिक आणि सामाजिक प्रश्न सोडवण्याला माझे प्राधान्य राहील," असा विश्वास डॉ. पंकज चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला.
या गौरव सोहळ्याप्रसंगी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. चौधरी यांच्या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्यात संघटनेच्या कार्याला एक नवीन दिशा आणि गती मिळेल, असा सूर उमटत आहे.



