*सावळदेच्या तापीघाटावर शिवमहापुराण कथा सोहळ्याची भक्तिमय सांगता,हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सावळदेच्या तापीघाटावर शिवमहापुराण कथा सोहळ्याची भक्तिमय सांगता,हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ*
*सावळदेच्या तापीघाटावर शिवमहापुराण कथा सोहळ्याची भक्तिमय सांगता,हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ*
शिरपूर(प्रतिनिधी):-अधिक मासानिमित्त सावळदे येथील श्री तीर्थक्षेत्र तापीघाट महादेव मंदिरात आयोजित भव्य शिवमहापुराण कथा सोहळ्याची आज भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण सांगता झाली. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या आध्यात्मिक पर्वाचा समारोप मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात पार पडला. सकाळी 8 ते 10 या वेळेत कृष्णकृपा प्रेममूर्ती ह.भ.प. दिलीपजी महाराज (वृंदावन धाम) जळगावकर यांनी शिवमहापुराण कथेमधील शिवतत्त्व, भक्ती, संस्कार आणि मानवकल्याणाचा संदेश देत भाविकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या ओजस्वी व अमृतमय वाणीतून झालेल्या अंतिम कथाश्रवणाने उपस्थित भाविक भावविभोर झाले. कथासमाप्तीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवभक्तांनी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संपूर्ण तापीघाट परिसर दुमदुमून सोडला.
कथा समाप्तीनंतर सकाळी 10 वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय चि. डॉ. अभिषेक दादा राजपूत यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. महिला, युवक आणि ग्रामस्थांनी सेवाभावाने महाप्रसाद व्यवस्थेत सहभाग घेतला. समस्त ग्रामस्थ, शिवभक्त महिला मंडळ आणि तापीघाट महादेव मंदिर सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी भाविकांनी आयोजकांचे कौतुक केले. सात दिवस चाललेल्या शिवमहापुराण कथेमुळे परिसरात धार्मिक जागृती, सामाजिक ऐक्य आणि शिवभक्तीची नवी ऊर्जा निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



