*कान्हाचा देश म्हणजे खान्देश,गावागावात गोकुळ निर्माण करा-श्रीदृमीलकुमार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कान्हाचा देश म्हणजे खान्देश,गावागावात गोकुळ निर्माण करा-श्रीदृमीलकुमार*
*कान्हाचा देश म्हणजे खान्देश,गावागावात गोकुळ निर्माण करा-श्रीदृमीलकुमार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कान्हाचा देश म्हणजे खान्देश, तसेच वैष्णव संप्रदायामार्फत भगवान श्रीकृष्णाचे कार्य गावागावात पोहोचल्याने गोकुळ निर्माण होईल. असे प्रतिपादन वैष्णवाचार्य वाकपिठाधीश्वर श्रीमद गोस्वामी 108 बडोदा निवासी दृमीलकुमार यांनी केले. नंदुरबार करांच्या अभूतपूर्व 56 भोग कार्यक्रम आयोजनाने प्रभावित झाल्यामुळे पुढील वर्षी पुन्हा नंदनगरीत येणार असल्याचे देखील श्री द्रमिलकुमार यांनी सांगितले.
येथील श्रॉफ हायस्कूलच्या मैदानावर दोन दिवसीय छप्पन भोग उत्सवाचे आयोजन उत्साहात संपन्न झाले. देसाईपुरा येथील मोठे मंदिर येथे दिव्य अलौकिक ब्रह्म संबंध कार्यक्रम झाले. सायंकाळी श्रॉफ हायस्कूल येथे भव्य प्रवचन झाले. भव्य 56 भोग कार्यक्रमात सात्विक आणि विधिवत छप्पनभोग महाप्रसादासाठी गुजरात आणि राजस्थान येथील प्रमुख आचारी नंदुरबारात दाखल झाले होते. गुजराती वैष्णव समाज बांधवांनी या धार्मिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.



