*युवासेनाप्रमुख सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सडेतोड वकृत्व स्पर्धा 2026 चे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*युवासेनाप्रमुख सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सडेतोड वकृत्व स्पर्धा 2026 चे आयोजन*
*युवासेनाप्रमुख सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सडेतोड वकृत्व स्पर्धा 2026 चे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्रातील तरुणांच्या विचारांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना तथा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने युवासेनेच्या वतीने सडेतोड वक्तृत्व स्पर्धे’ 2026 चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा केवळ वक्तृत्वापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रासाठी विचार करणाऱ्या, ठाम भूमिका मांडणाऱ्या आणि भविष्यातील नेतृत्व घडवणाऱ्या तरुणांचा शोध घेण्याचा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले. सदर स्पर्धेत 20 युवक -युवतीं नी सहभाग घेत व्हिजन महाराष्ट्र 2050 आणि राजकारण आणि समाजकारण युवकांची भूमिका’ या दोन विषयांवर आपले विचार सादर केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर अनुक्रमे एक ते तीन नंबर काढून त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख सागर पाटील यांच्या मार्गदर्शना खाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा तळोदा प्रवक्ता अकॅडमीचे संचालक समाधान पाटील व नंदुरबार प्रवक्ता अकॅडमी संचालक राकेश महिरे यांच्या सौजन्याने करण्यात आली. यावेळी बरेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्पर्धेत भाग घेत राजकारण व समाजकारण या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंडित माळी, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, तालुकाप्रमुख रमेश पाटील, युवा सेना उपजिल्हाप्रमुख दिनेश भोपे, व्यापारी असोसिएशन जिल्हाध्यक्ष बापू महाजन, अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख इम्तियाज पटेल, युवा सेना जिल्हा सचिव अक्षय श्रीखंडे, युवा सेना शहर प्रमुख एजाज काझी शहर प्रमुख शहर शेखर जाधव शिवसेना कार्याध्यक्ष मन्नान गणी युवा सेना सोशल मीडिया आयन खाटीक राज पाटील वाहतूक सेना प्रमुख कुणाल पवार रोहित मराठे युवा सेना उपशहर प्रमुख आधी शिवसैनिक व मान्यवर उपस्थित होतेएजाज काझी शहर प्रमुख शहर शेखर जाधव शिवसेना कार्याध्यक्ष मन्नान गणी युवा सेना सोशल मीडिया आयन खाटीक राज पाटील वाहतूक सेना प्रमुख कुणाल पवार रोहित मराठे युवा सेना उपशहर प्रमुख यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



