*सुरगाणा तालुक्यात चोवीस तासापासून बत्ती गुल, पसरले अंधाराचे साम्राज्य, दूर्गम भागात वन्यजीवांचा मुक्त संचार, विंचू, सापाची ग्रामस्थांमध्ये दहशत, भ्रमणध्वनी चार्जिंग करीता सीमावर्ती भाग
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सुरगाणा तालुक्यात चोवीस तासापासून बत्ती गुल, पसरले अंधाराचे साम्राज्य, दूर्गम भागात वन्यजीवांचा मुक्त संचार, विंचू, सापाची ग्रामस्थांमध्ये दहशत, भ्रमणध्वनी चार्जिंग करीता सीमावर्ती भाग
*सुरगाणा तालुक्यात चोवीस तासापासून बत्ती गुल, पसरले अंधाराचे साम्राज्य, दूर्गम भागात वन्यजीवांचा मुक्त संचार, विंचू, सापाची ग्रामस्थांमध्ये दहशत, भ्रमणध्वनी चार्जिंग करीता सीमावर्ती भागात गुजरातच्या गावात धाव, अनेक मोबाईल टॉवर नाॅट रिचेबल, डास, उकाड्याने नागरिक हैराण, श्वानदंश, सर्प दंश लसी ठेवणार कोठे, फ्रिजमध्ये ठेवणे जोगी औषधे खराब होण्याची भीती*
सुरगाणा(प्रतिनिधी):-तालुक्यात दोन दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले असून जंगल व्याप्त भागातील आदिवासी बांधव अंधारात चाचपडत आहेत. रात्री अपरात्री घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. तसेच बोअरवेल, विहिरी यांनी तळ गाठला असून वीजे अभावी थोड थोडके मिळणारे पाणी दुरापास्त झाले आहे.पाण्याच्या शोधार्थ नागरिकांना वणवण भटकंती करत जंगलातील वन्यजीवांच्या पाणवठ्यावर माणसानींच पाण्यासाठी अतिक्रमण केले सारखी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. आकाश ढगाळलेले तसेच उन्हाची तिव्रता जास्त
असल्याने रात्री हवेत गारवा निर्माण होत असल्याने रस्त्यावर सरपटणारे प्राण्यांच्या वावर वाढला आहे. वीजे अभावी दुकानदारांकडे थंड पाण्याची बाटली मिळणे दुरापास्त झाले आहे.सर्वत्र बिबट्यांच्या दहशती पोटी दिंडोरी पश्चिम पट्टा, कळवण पश्चिम पट्टा, सुरगाणा तालुक्यातील पर्वत रांगांमध्ये मानव निर्मित वणव्यात सर्व जंगल जळून खाक झाल्याने वन्यजीवांचा लपण्यासाठी आश्रयस्थान मिळत नसल्याने वन्यजीवांचा कल मानवी वस्तीकडे वळला आहे. वीजे अभावी पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. वीज नसल्याने विद्यार्थी शाळेचे प्रवेशासाठी लागणारे ऑनलाईन दाखले मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर कॅफेमध्ये चकरा माराव्या लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्याने जनजीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. रात्री अकरा वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला आहे. सर्वत्र तालुक्यात अंधाराचे साम्राज्य पसरल्याने विंचू, काट्याची भीती मुळे नागरिक जीव मुठीत धरुन फिरावे लागत आहे. त्यामुळे कधी फिटणार अंधाराचे जाळे, होणार मोकळे आकाश " असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. वीज नसल्याने वातावरणात उष्णता वाढल्याने गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते आहे. वीज वितरण कार्यालयाने तात्काळ समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. माजी सैनिक शिवराम चौधरी यांनी सांगितले की,
आमचा परिसर गाव गुजरात डांग सीमावर्ती भागात असून चोवीस तासापेक्षा जास्त वेळ वीज गायब झाली आहे. वीजे अभावी दळण नसल्याने चपाती, भाकरी जेवणात नसल्याने केवळ पोट भरण्यासाठी भातच खावा लागतो आहे. बोअरवेल, विहरी यांनी तळ गाठल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते आहे. आता पंचाहत्तरी ओलांडल्याने दुरवरुन हंडाभर पाणी आणता येत नाही. जर दिंडोरी पासून वीज वाहिनीवरील वीज पुरवठा खंडीत होऊन चोवीस तासाचा कालावधी लोटला तरी अद्यापही वीज पुरवठा सुरळीत चालू झाला नाही. हे आजच्या ए आय, विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण मागे असल्याचे निदर्शनास येते आहे. तरी सध्या पावसाळा सुरू झालेला नाही. गुजरात राज्यातील वीज माझ्या गावापासून दिसतेय त्यामुळे अकबर, बिरबलाची गोष्ट लक्षात येते. तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा. पावसाळा सुरू होण्यापूर्वी वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्यात येत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण होते आहे. मायबाप सरकार आम्ही पण माणसे आहोत. माणूस म्हणून जगू द्या. हिच माफक अपेक्षा. वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा
अशी मागणी केली जाते आहे.



