*पाचल येथे 5 जूनला अधिकमासा निमित्त वारकरी यांची मांदीआळी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पाचल येथे 5 जूनला अधिकमासा निमित्त वारकरी यांची मांदीआळी*
*पाचल येथे 5 जूनला अधिकमासा निमित्त वारकरी यांची मांदीआळी*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातिल पाचल या गावी अधिकमासानिमित्त राजापूर तालुका अखंड वारकरी सांप्रदाय, पाचल पूर्व विभाग यांच्या वतीने शुक्रवार 5 जून 2026 रोजी श्री महागणपती मंदिर, पाचल येथे भव्य हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक या वातावरणात होणाऱ्या या भक्तिमय सोहळ्यास पंचक्रोशीतील वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजापूर अखंड वारकरी सांप्रदाय यांनी केले आहे.
अधिकमासाच्या पुण्यकाळात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाची सुरुवात सायंकाळी 4 वाजता सामूहिक गीतावाचन व विष्णू सहस्रनाम पठणाने होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5.30 ते 7 या वेळेत सामुदायिक हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री 7.30 ते 9.30 या वेळेत ह.भ.प. दौलत महाराज पाटेकर यांचे कीर्तन होणार असून, त्यांच्या रसाळ आणि प्रबोधनपर कीर्तनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. कार्यक्रमाची सांगता रात्री 9.30 वाजता महाप्रसादाने होईल.
या महोत्सवासाठी वें. ह.भ.प. सोनुबाबा कुर्णे कर पायी दिंडी संस्था, ता. लांजा यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. नामस्मरण, भक्ती आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या हरिनाम महोत्सवातून आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असून, अधिकाधिक भाविकांनी या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजापूर तालुका अखंड वारकरी सांप्रदाय, पाचल तसेच श्री महागणपती उत्सव मंडळ, पाचल यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्या प्रसंगी राजापूर तालुका अखंड वारकरी सांप्रदाय यांचे सर्वश्ची गायनाचार्य व मृदुंग मणी, वादक टाळकरी, वारकरी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.



