*खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद साधण्यासाठी 5 जून रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद साधण्यासाठी 5 जून रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक*
*खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद साधण्यासाठी 5 जून रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना संघटना अधिक सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेनेचे नेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभानिहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसंवाद दौरा राज्यभर सुरू असून, शुक्रवार 5 जून रोजी नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत. यावेळी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी देखील उपस्थित राहतील. शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने संघटन बळकटीकरणावर भर दिला आहे. खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्रातील निवडणुकांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिंदेसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा 16 मे 2026 पासून सुरू असून, 16 मे ते 15 जुलै असे तब्बल दोन महिने चालणाऱ्या या व्यापक दौऱ्यात राज्यातील 22 जिल्हे आणि 100 हून अधिक विधानसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे पिंजून काढणार आहेत.
खा.श्रीकांत शिंदे यांच्या शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने शुक्रवार,दि.5 जून रोजी नंदुरबार जिल्ह्यात येत असल्याची माहिती शिवसेना नेते, आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. 5 जून रोजी सकाळी 10 वाजता तळोदा येथे शहादा तळोदा व धडगाव, अक्कलकुवा विधानसभा मतदार संघाची बैठक घेतील. दुपारी 1 वाजता नंदुरबार येथे नंदुरबार व नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या आढावा घेतील. त्यानंतर धुळ्याला प्रयान करतील.
बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. आमश्या पाडवी, शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख माजी आ.शिरीष चौधरी, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांनी केले आहे.
शिवसेनेचे संसदीय गटनेते,खा.श्रीकांत शिंदे 5 जून रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली असून, सर्व प्रमुख कार्यकर्ते, शाखाप्रमुख, पक्षाचे बीएलओ, जि.प,पं. स.सदस्य, नगरसेवक यांनी उपस्थित रहावे. बैठकीत खा.शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले आहे.



