*आंगले सौंदळकर वाडी येथील धोकादायक ट्रान्स फाॅर्मर व विविध वाडयांवरील गंजलेले पोल बदलण्याची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आंगले सौंदळकर वाडी येथील धोकादायक ट्रान्स फाॅर्मर व विविध वाडयांवरील गंजलेले पोल बदलण्याची मागणी*
*आंगले सौंदळकर वाडी येथील धोकादायक ट्रान्स फाॅर्मर व विविध वाडयांवरील गंजलेले पोल बदलण्याची मागणी*
आंगले(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील आंगले गावातील अनेक वीज खांब गंजलेले असून वाड्या मधील विविध पोल बदलले असले अजूनही काही पोल एकदम जीर्ण झाले असून धोकादायक स्थितीत आहेत सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी महावितरण कार्यालय राजापूर तसेच रत्नागिरी येथील अधिकारी यांच्या कार्यालयात अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून आल्यावर गावातील काही वाडीतील थोडेफार पोल बदलण्यात आले आहेत उर्वरीत पोल अजून बाकी आहेत तसेच सौंदाळकरवाडी येथे असलेला इलेक्ट्रिक टांगफॉर्मर अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ते पावसाळ्यापूर्वी बदलून मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत हे या कामाकरिता सतत पाठपुरावा करत आहेत. गावातील सरवणकर वाडी येथील दोन ते तीन खांब तसेच कातलवाडीतील सुभाष तिर्लोटकर यांच्या घराशेजारील दोन पोल अत्यंत जिर्णावस्थेत असून पावसाळ्यात जिवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे तसेच राऊत वरची व खालची राऊतवाडी येथे थ्री फेजची आवश्यकता असून ही मागणी गेल्या तीन चार वर्षांची आहे यामुळे इलेक्ट्रिक उपकरणे आवश्यक तेवढ्या क्षमतेने चालत नाहीत मंद प्रकाश, कमी दाबाने वीज पुरवठा अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे गेली चार वर्षे प्रयत्न करुनही महावितरण लक्ष देत नसल्याने गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.



