*शिवकालीन स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबीर डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल च्या मैदानात!*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवकालीन स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबीर डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल च्या मैदानात!*
*शिवकालीन स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबीर डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल च्या मैदानात!*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल च्या मैदानात 15 ते 40 वयोगटातील युवक आणि युवतींसाठी 11 दिवसीय शिवकालीन स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर दि. 3 जून 2026 ते 13 जून 2026 दरम्यान राष्ट्र धर्म साधना प्रशिक्षण गुरुकुल यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात स्वरक्षा तंत्र, लाठी काठी, लाठी काठी युद्ध, भाला, दांडपट्टा, दंडसाखळी, व्यायाम, हनुमान दंड बैठक, निशस्त्र युद्ध, चाकू पासून संरक्षण, प्रार्थना, मार्शल आर्ट, स्नायू मजबूत करणारी व्यायाम पद्धती आणि अजून भरपूर काही शिकायला मिळणार आहे. यासह युवकांनी सक्षम मानसिकता जोपासून स्वतः प्रशिक्षित होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सकाळी 5.60 ते 7.30 आणि सायंकाळी 6 ते 8 या दोन वेळेत दररोज शिबीर पार पडणार आहे. याठिकाणी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्यांना टेक्निकली रजिस्ट्रेशन करायला अडचण असेल त्यांच्यासाठी शिबिराच्या ठिकाणी सुद्धा रजिस्ट्रेशन करण्यासाठी सोय केलेली आहे.
सरावासाठी सर्व साहित्य शिबिरातच मिळणार आहे.
रजिस्ट्रेशन लिंक
https://forms.gle/SosfErpdTgWbPVdz तरी या उपक्रमात जास्तीत जास्त युवक आणि युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्र धर्म साधना प्रशिक्षण गुरुकुल च्या वतीने करण्यात आले आहे. शरद पाटील
(प्रशिक्षक)
राष्ट्र धर्म साधना प्रशिक्षण गुरुकुल
9307656099



