*वाल्ये गावचा वार्षिक आनंदोत्सव आणि भव्य मोफत आरोग्य शिबिर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वाल्ये गावचा वार्षिक आनंदोत्सव आणि भव्य मोफत आरोग्य शिबिर*
*वाल्ये गावचा वार्षिक आनंदोत्सव आणि भव्य मोफत आरोग्य शिबिर*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील निसर्गरम्य परिसरातील वाल्ये गावचे ग्रामदैवत आणि समस्त गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या निनादेवी, पावणादेवी आणि श्री कालिकादेवी या प्राचीन देवस्थानचा वार्षिक आनंदोत्सव सोबतच श्री रामेश्वर मंदिराचा सोळावा वर्धापन दिन यावर्षी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. वाल्ये येथील स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबई ग्रामस्थ यांच्या विशेष सहभागातून दिनांक 9 व 10 मे 2026 या कालावधीत विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्रामस्थांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आयोजित केलेले भव्य आरोग्य शिबिर. जीवनविद्या मिशन ज्ञान साधना केंद्र, जोगेश्वरी यांच्या वतीने आयोजित या शिबिरात चिपळूण येथील 'नॅब आय हॉस्पिटल'च्या सहकार्याने मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया सेवा विनामूल्य करण्यात आली. तसेच, पिंगुळी (गुढीपूर) येथील डॉ. उत्कर्षा मेस्त्री (BHMS) यांनी देखील या शिबिरात उपस्थित राहून आपली अमूल्य वैद्यकीय सेवा आणि मार्गदर्शन दिले. या उत्सवादरम्यान अध्यात्म आणि समाजप्रबोधनाची जोड देत, सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित विशेष मार्गदर्शन करण्यात आले. याच मालिकेचा भाग म्हणून दिनांक 9 मे रोजी रात्री 9 वाजता देवगडचे सुपुत्र आणि प्रसिद्ध प्रवचनकार आत्माराम कानु कोयंडे यांचे विशेष प्रवचन संपन्न झाले. वाल्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. दिपाली दशरथ तावडे, उपसरपंच अजय वसंत सुतार, माजी पोलीस पाटील मधुकर हरि सुतार, तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत जैतापकर, गावपाटील अनंत नागू तावडे आणि संतोष वसंत तावडे, एकनाथ राजाराम तावडे, मनोहर वासुदेव तावडे आणि शुभम मनोहर तावडे तसेच जीवनविद्या मिशनचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. वाल्ये पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी या सुवर्णसंधीचा आणि आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.



