ताजा खबरे:
*खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर, संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण*
*मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसाठी, शहादा येथे कंत्राटदारांनी अर्ज करण्याचे आवाहन*
*प्रियंका पाटील यांची सहाय्यक प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती*
*"मधाचे गाव तळवडे" संभाजीनगर येथे जागतिक मधमाशा पालन दिन कार्यक्रमाला सुरेश गुडेकर यांची उपस्थिती*
*लायन्स क्लब सेक्रेटरी दिनेश वाडेकर प्लॅटिनम आणि डायमंड पुरस्काराने सन्मानित*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर, संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर, संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण*

  • Share:

*खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर, संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण*
चिपळूण(प्रतिनिधी):-तालुक्यातील खेरशेत गाव पुन्हा एकदा सामाजिक जागृती, धम्म विचार आणि परिवर्तनवादी चळवळीच्या उत्साहाने दुमदुमले. चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती गाव शाखा खेरशेत, धम्म भूषण विकास संघ खेरशेत-मुंबई, यशोधरा महिला मंडळ आणि सम्यक युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तक्षशिला बुध्द विहारात दि.13,14, 15 मे रोजी आयोजित भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वभूषण राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव व तक्षशिला बुद्ध विहाराच्या वर्धापन दिन सोहळ्यास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. यावेळी प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळ्यामुळे बुद्ध विहार परिसर तीन दिवस विचार, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीच्या तेजाने उजळून निघाला. खेरशेत मध्ये भरलेला हा संयुक्त जयंती महोत्सव केवळ उत्सव न ठरता सामाजिक परिवर्तन, बंधुभाव आणि विचार जागृतीचा प्रेरणादायी सोहळा ठरला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. साक्षी मोहिते यांनी बौद्ध संस्कार विधी पार पाडला. पहिल्या दिवशी अ‍ॅड. विभावरी रजपूत यांनी “भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांसाठी योगदान” या विषयावर प्रभावी व्याख्यान देत महिलांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाचा वेध घेतला. तर बौद्ध उपासिका क्रांतीताई कदम यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती रमाई यांच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास उलगडून सांगितला.
यावेळी यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा शैला कदम यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सूत्रसंचालन साक्षी कदम, प्रबोधिनी कदम आणि संघरक्षिता कदम यांनी प्रभावीपणे केले. स्थानिक महिलांच्या पुढाकारातून सादर करण्यात आलेल्या “स्त्रीभ्रूणहत्या” या सामाजिक आशयघन नाटिकेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. दुसऱ्या दिवशी बालव्याख्याते असित सुर्वे यांनी “विश्वाला युद्ध हवे की बुद्ध?” या विषयावर अत्यंत प्रभावी विचार मांडत शांतता आणि मानवतेचा संदेश दिला. व्याख्याते शिवश्री प्रदीप कांबळे यांनी भगवान बुद्धांचा धम्म, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान यामधील वैचारिक नाते विशद केले. तर शिवश्री महेंद्रसिंग जालगावकर यांनी “फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीची नांदी” या विषयावर विचारमंथन घडवून आणले. दुसऱ्या सत्रात पूज्य भंतेजी डॉ. ए. सुमेध बोधीजी, राष्ट्रीय महासचिव भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत धम्मदेसना पार पडली. त्यांच्या शांत, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी प्रवचनाने उपस्थित धम्मबंधू अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
समारोप प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच बुद्धविहार उभारणीसाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा जाहीर सभेत गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी खेरशेत संघटनेच्या समाजोपयोगी कार्याचे विशेष कौतुक करत काही मान्यवरांचा सत्कार केला. हा भव्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी मुंबई संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम, स्थानिक अध्यक्ष सुनील कदम, सम्यक युवा मंच अध्यक्ष आकाश कदम, सामाजिक कार्यकर्ते काशीराम कदम गुरुजी यांच्यासह शरद कदम, संजय कदम, अनंत कदम, प्रदीप कदम, सुधाकर कदम, अ‍ॅड. प्रशितोष कदम, राजेंद्र कदम, मिहीर कदम, विजय कदम, दयानंद कदम, संजोत कदम, मिलिंद कदम, लक्ष्मण कदम, राहुल कदम, प्रतीक मोहिते आदींनी अथक परिश्रम घेतले. आमदार शेखर निकम यांनीही कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. ते म्हणाले, आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. डॉ. आंबेडकरांच्या आदर्श विचारांची जपणूक करणे नागरिकाचे कर्तव्य आहे. आमदार निधीतून तक्षशिला बुद्ध विहाराच्या सुशोभिकरणासाठी दहा लाख रुपये देण्याची घोषणाही आ. निकम यांनी यावेळी करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. या कार्यक्रमास बहुजन विकास आघाडीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश भायजे, पंचायत समिती सदस्य सुभाष जाधव, महेश सावंत, विनोद कदम, संदीप गमरे, खेरशेत येथील पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत जाधव, वसंत जाधव,  खेरशेत माजी सरपंच रवी मते, पोलीस पाटील अमर जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, मुंबई संघटनेचे मंगेश जाधव, खेरशेत येथील प्रसिद्ध उद्योजक सोमा बेंडल, महेंद्र कदम, स्वप्निल कदम, अक्षय कदम, सुशांत कदम, नवनीत कदम, नितीन कदम, सुभाष कदम, राजू कासारे, रमेश कदम, ऋषिकेश कदम, रोहन कदम, निखिल कदम, धर्मदास कदम, भिमदास कदम, धर्मवर्धन कदम, ज्येष्ठ सल्लागार चंद्रमणी कदम, राजाराम कासारे, जि.प सदस्य संजय कदम, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते, विलास मोहिते, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर, संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण*
May, 21 2026
*मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसाठी, शहादा येथे कंत्राटदारांनी अर्ज करण्याचे आवाहन*
May, 21 2026
*प्रियंका पाटील यांची सहाय्यक प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती*
May, 21 2026
*"मधाचे गाव तळवडे" संभाजीनगर येथे जागतिक मधमाशा पालन दिन कार्यक्रमाला सुरेश गुडेकर यांची उपस्थिती*
May, 21 2026
*लायन्स क्लब सेक्रेटरी दिनेश वाडेकर प्लॅटिनम आणि डायमंड पुरस्काराने सन्मानित*
May, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज