*अवैधरित्या अंमली पदार्थाची वाहतुक करणारे इसम शहादा पोलीसांचे ताब्यात,एकुण 4 लाख 81 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत 2 आरोपी ताब्यात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अवैधरित्या अंमली पदार्थाची वाहतुक करणारे इसम शहादा पोलीसांचे ताब्यात,एकुण 4 लाख 81 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत 2 आरोपी ताब्यात*
*अवैधरित्या अंमली पदार्थाची वाहतुक करणारे इसम शहादा पोलीसांचे ताब्यात,एकुण 4 लाख 81 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत 2 आरोपी ताब्यात*
नंदूरबार(प्रतिनिधी):-15 मे 2026 रोजी शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी हेमंतकुमार पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, शहादा पोलीस ठाणे अंतर्गत असलोद दुरक्षेत्र हद्दीत दोन इसम हे स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी मानवी मेंदुवर विपरित परिणाम करणारे गुंगीकारक असा सुका गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडील मोटारसायकलीने धडगाव कडून असलोद मार्गे शिरपूरकडे वाहतुक करत आहेत, अशी खात्रिशीर माहिती मिळाल्यावरुन शहादा पोलीस ठाणे प्रभारी हेमंतकुमार पाटील यांनी पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी रवाना केले, मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे शहादा पोलीस पथक, पंच असे असलोद दामळदा रोडवरील एका संस्थान जवळील असलोद येथील गेट जवळ सापळा रचुन थांबले असता रात्रीचे वेळी दामळदा रोडकडून असलोदकडे दोन इसम हे संशयितरित्या एका लाल रंगाच्या मोटारसायलवर त्यांच्याजवळ काही बॅगसहित येतांना दिसले. पथकाने सदर मोटारसायकलला हात देऊन थांबविले असता मोटारसायकलचा क्रमांक MH 03 BK 7511 असा दिसुन आला. वाहनावरील दोन्ही इसमांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे सुशिल सुमा पावरा, वय 30 वर्षे, रा.मोहिदा, ता. शिरपुर जि.धुळे, गजेंद्र जितेंद्र पावरा, वय 21 वर्षे, रा. मोहिदा ता.शिरपुर जि. धुळे असे सांगितले. सदर इसमांना त्यांचे ताब्यातील बॅग्समध्ये काय आहे बाबत विचारता ते असंबंध्द अशी उत्तरे देऊ लागले. त्यावेळी उपस्थित पथकास सदर इसमांवर संशय बळावल्याने त्यांच्या ताब्यातील एक झोला व दोन बॅग्सची तपासणी करता त्यामध्ये एकुण तब्बल 20 किलो 564 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ (सुका गांजा) मिळून आला असून एकुण 4 लाख 81 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल दुचाकीसह जप्त करण्यात आला आहे. सदर इसमांना त्यांचेकडेस गांजा विक्री व वाहतुक करण्याचा परवाना आहे अगर कसे बाबत विचारणा करता त्यांनी कुठलाही परवानगी नसल्याचे कळविले असुन त्याअन्वये सदर इसमांवर शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 557/ 2026 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम -1985 चे कलम 8 (क), 20(ब) (ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी हेमंतकुमार पाटील, सपोनि संदीप वाघ, असई/अशोक कोळी, पोहेकॉ बहादुर भिलाला, पोशि/भगवान सावळे, कपिल मंदील, विकास शिरसाठ, भरत शिंपी, मिथुन सिसोदे यांनी केली आहे.



